Ticker

6/Breaking/ticker-posts

शेवगाव पालिकेचे कर्मचारी ७ महिन्यांपासून पगाराविना ; संजय नागरे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

शेवगाव : शेवगाव नगर परिषदेचे जवळजवळ ७० ते ७५ कर्मचारी हे गेल्या सहा-सात महिन्यापासून पगार नसल्यामुळे विमनस्क अवस्थेत काम करीत आहेत, काल संजय नागरे यांच्या सह एकत्र येऊन यावेळी संजय नागरे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.

 

शेवगाव नगर परिषदे मधील कर्मचाऱ्यांना गेल्या सात-आठ महिन्यांपासून पगार नसल्यामुळे, त्यांच्या कुटुंबाला आर्थिक समस्येचा दररोज सामना करावा लागत आहे, अधिकारी मात्र एकमेकांकडे बोट दाखवत आपली जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करत आहे, अधिकाऱ्यांच्या ह्या घोळामुळे शेवगाव नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांचे गेल्या सात-आठ महिन्यांपासून पगार थकीत आहे तसेच शासनाच्या नियमानुसार किमान वेतन द्यावी शेवगाव नगर परिषदेकडून दिली जात नसल्यामुळे शेवगाव नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आज मुख्य अधिकार्‍यांच्या दालनात आज सकाळी ठिय्या दिला होता यावेळी शेवगाव नगर परिषदेचे कर्मचारी संतप्त झाले होते,

 

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव संजय नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आज संजय नागरे यांनी शेवगाव नगर परिषद कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला मात्र यावेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले,यावेळी नगर परिषद कार्यालय मध्ये महिला कर्मचारी व पुरुष कर्मचारी यांनी मोठी गर्दी केली होती, यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संजय फडके यांनी मध्यस्थी करायचा प्रयत्न केला परंतु यशस्वी झाला नाही,यावेळी कर्मचार्‍यांच्या भावना या तीव्र होत्या,पगार पत्रकावर कोणी सह्या करायच्या यावरूनही मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे यावेळी लक्षात आले, यावेळी पोलीस कर्मचारी बप्पासाहेब धाकतोडे व‌ धोतरे एस के यांनी संजय नांगरे यांना ताब्यात घेतले,नंतर मनधरणी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले,

चार्ज कोणाकडे यावरून संभ्रम

व्यापारी तसेच अन्य दृष्टीने महत्त्वाची समजली जाणारी शेवगाव नगरपरिषदेचा चार्ज अंबादास गर्कळ,अजित निकड, त्या पाथर्डीचे मुख्याधिकारी लांडगे यापैकी शेवगाव नगर परिषदेचा अतिरिक्त पदभार कोणाकडे यावरून मोठा सावळा गोंधळ निर्माण झाला होता, शेवटी शेवगाव नगरपरिषदेचा अतिरिक्त पदभार हा पाथर्डी चे मुख्याधिकारी लांडगे यांच्याकडे असलेल्याचे समजते शेवगाव नगर पालिकेच्या गलथान कारभारामुळे जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या