लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विखे थोरात या पारंपारिक राजकीय विरोधकांनी यावेळी सर्व हेवेदावे आणाी राजकारण बाजूला सारून एकी दाखवली त्यासाठी चाणक्य डॉ. सुजय विखे पाटील यांनी अत्यंत शांत आणि संयमीपणाने ही रणनिती आखून दोन पावले मागे सरत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी जुळवून घेतले. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सुरूवातीपासून या दोन्ही गटाच्या हालचालींवर आपला विरोधी बाण चालविले. मात्र कायम आपल्या धडाकेबाज वक्तव्यांसाठी प्रसिध्द असलेले डॉ, सुजय विखेंनी त्यांचे बाऊंसर शांतपणे लिलया खेळून काढले. काहीही न बोलता ही समझोता एक्सप्रेस नेटाने पुढे सुरू ठेवली. या मध्ये खा. नीलेश लंके, माजी खा. लोखांडे यांनी विरोधकांना गोंजारत पॅनल उभा केला. तर सभापती शिंदे यांनीही उमेदवारांसह आपला तिसरा पॅनल जाहीर करून वरकरणी लढतीचे चित्र निर्माण करण्यात यश मिळविले. परंतु सुरूवातीला ५ जागा बिनविरोध करून माघारीच्या दिवशी आणखी पाच जागा बिनविरोध करण्यात थोरात विखे गटाने बाजी मारली.इथेच बँकेचे चित्र स्पष्ट झाले. सभापती शिंदे यांचीही जामखेडची जागा बिनविरोध झाली. परंतु प्रस्थापितांविरूध्द विस्थापित असा सामना काही झाला नाही. डॉ. सुजय विखेंच्या विजयी पत्रकार परिषदेत मांडलेल्या भूमिकेवरून मतांच्या बेरजेचे गणीत पाहता तो होणार नव्हता हे स्पष्टच आहे. गरज नसताना बँकेवर गेल्यावेळेसारखीच पुन्हा निवडणूक लादली गेली. तरीही विखे थोरात यांनीच आणखी ७ जागा जिंकून बँकवरील आपली कमांड सिध्द केली. यावेळी सभापती शिंदे यांना कर्जत जामखेड दोन जागा मिळाल्या आणि खा. लंके यांना बँकेत जाण्याची संधी मिळाली. एवढाच काय तो फरक झाला. असो.. आता निवडणूकीचं आणि त्यात नको नको म्हणता पडद्याआडच्या राजकारणाचं कवित्व आता संपलय. आता अध्यपदी कोणाची वर्णी लागते याकडे जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत.
जिल्हा बँकेत थोरात विखे यांचीच सत्त राहणार परंतु राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे आपसूकच बॅकेत भाजपचा अध्यक्ष फायनल झाल्यात जमा आहे. त्यामुळे थोरात गटाला उपाध्यपदावर समाधान मानावे लागेल अशी अटकळ बांधली जात आहे. बँकेची निवडणूक सुरू झाल्यापासूनच माजी खा. डॉ. सुजय विखे यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे.ते त्यांनीही नाकारलेलं नाही. परंतु त्यांच्याबरेाबरच बाळासाहेब थोरात यांचे जावई रणजित देशमुख, आ. मोनिका राजळे, शंकरराव गडाख, बिपीन कोल्हे यांचीही नावे चर्चेत आहेत.त्यात डॉ. विखेंनी अध्यपदाचे नाव ऐकून सर्वांना धक्का बसेल असे विधान करून आणखी सस्पेंस वाढविला आहे. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणाच्या नावावर मोहर उमटवतात याची उत्सूकता दाटली आहे.

0 टिप्पण्या