Ticker

6/Breaking/ticker-posts

वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रा दादासाहेब खेडकर यांची हाताच्या पंजाला साथ

 महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


खरवंडी कासार :वंचितचे ऊस तोड मजूर कामगार आघाडीचे अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दादासाहेब खेडकर यांनी हाताच्या पंजाला साथ देण्याचे ठरवत महसूल मंत्री  बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी खेडकर यांची युवक काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली .

यावेळी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक व काँग्रेसचे नेते गणपतराव सांगळे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नासिर शेख उपाध्यक्ष रविद्र पालवे युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश शेलार मालेवाडीचे सरपंच आजिनाथ  दराडे एन टी काँग्रेसचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष बाबासाहेब वाघ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब शेख काँग्रेसचे युवक शहर उपअध्यक्ष महेश दौंड दिनकर सचिन राजळे तसेच पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते .

यावेळी पक्ष प्रवेशानंतर बोलताना प्रा दादासाहेब खेडकर यांनी भगवान गड ३५ गावची पाणी योजना तातडीने मंजूर करण्यासंदर्भात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे मागणी केली .मालेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामासंदर्भात निधी मिळण्यासाठी निवेदन दिले तसेच भगवान गड परिसर प्रेस क्लब च्या वतीने पाथर्डी तालुक्यातील कोविड योद्ध्यांचा सन्मान सोहळा कार्यक्रमाचे निमंत्रण दिले यावेळी बाळासाहेब थोरात यांनी अखिल भारतीय काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याबद्दल स्वागत केले आणि भगवान गड परिसर ३५ गावची पाणी योजना मंजुरी संदर्भात तातडीने पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील आणि जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत मंत्रालयात बैठक घेऊन भगवानगड ३५ गाव पाणी योजना मंजूर करण्यासंदर्भात आश्वस्त केले.


गेली दहा वर्षापासून शैक्षणिक सामाजिक जीवनात काम करत असताना विद्यार्थीदशेत कॉलेज जीवनामध्ये चळवळीत काम करत असताना सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढत राहिलो देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आज पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने या देशाचा विकास केला आहे यामुळे फुले शिव शाहू आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन राजकीय जीवनात सक्रिय झालो माझे आदर्श माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे लोकनेते स्व गोपीनाथरावजी मुंडे स्व राजीवजी सातव अखिल भारतीय कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुलजी गांधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले विधिमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या संघर्षमय राजकीय जीवनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस पक्षाला बळकटी देण्याचा व काँग्रेसची विचारधारा जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न करणार आहे - प्रा दादासाहेब खेडकरटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या