Ticker

6/Breaking/ticker-posts

जनावरे दगावलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी- सौ.ढाकणे

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

पाथडीॕ- तालुक्यात सोमवारी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावातील शेतकऱ्यांच्या जनावरे दगावली असून संबंधित शेतकऱ्यांना शासननाकडून त्याची भरपाई मिळावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या सौ.प्रभावती प्रतापराव ढाकणे यांनी केली आहे.

   यासंदभाॕत सौ.ढाकणे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पशु संवर्धन अधिकारी यांना सविस्तर निवेदन देत म्हटले आहे की,सोमवारी मध्यरात्री पाथडीॕ तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली.त्याचा फटका शेती पिकांसोबतच शेतकऱ्यांच्या पशुधनालाही बसला.अनेक गावांतील शेतकऱ्यांची जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली तर अनेक पावसाच्या माराने गतप्राण झाली.

कोरडगाव येथील सुभाष कुंडलिक देशमुख यांची दुभती म्हैस,नामदेव पालवे यांचा खिलार जातीचा एक बैल,आनंद सुखदेव जाधव यांची शेळी.शेकटे येथील कुंडलिक तुकाराम घुले यांची दुभती म्हैस.अकोला येथील अस्लम रज्जाक शेख यांच्या तीन शेळ्या,चांदभाई बापूभाई शेख यांच्या एक गाय व तीन शेळ्या,उस्मान इमाम शेख यांच्या दोन शेळ्या,हनुमंत आसाराम गर्जे यांचा एक बैल,राजू कडुभाई शेख यांच्या ४ शेळ्या तसेच कोळसांगवी येथील गौतम दिनकर वाघ यांचा एक बैल तर कोळसांगवी येथीलच सुभाष कुंडलिक देशमुख यांची एक दुभती गाय अशी जनावरे दगावली असून संबंधित शेतकऱ्यांची ही पशुधन शेती कामासाठी मदतीची व त्यांच्या कुटूंबाची उत्पन्नाची साधने होती.त्यामुळे या शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी प्रभावती ढाकणे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या