लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
कर्जत : तालुक्यातील भांबोरा येथे एल आय सी भरणा केंद्राचे उदघाटन व कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात जगातील सर्वात मोठया मोफत लसीकरण अभियानास खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांनी भेट दिली.तसेच प.स सभागृहात तालुक्यातील सर्व विभागातील कामकाज आढावा अधिकारी व ग्रामस्थांन समवेत घेतला.
राशीन येथे यूनियन बँक शाखेस भेट देऊन दैनंदिन कामकाजाची माहिती घेऊन केंद्र सरकारच्या विविध योजनांची काटेकोर पणे आंबलबजावनी करण्यासाठी योग्य त्या सूचनाअधिकाऱ्यांना दिल्या.तसेच बँकेचे शाखाधिकारी सचिन शिरसागर यांची युनियन बँकेच्या ऑल इंडिया फेडरेशन च्या कार्यकारी सद्स्यपदी निवड झाल्या बद्दल सत्कार केला.व राशीन येथील चहा व्यवसाय करणारे आप्पासाहेब सायकर यांनी नवीन गाडी घेतली त्या गाडीची खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते पूजा केली.
याप्रसंगी माजी मंत्री प्रा. राम शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, भाजपचे तालुका अध्यक्ष डॉ सुनील गावडे,दादासाहेब सोनमाळी,एल आय सी चे गोपीनाथ जगताप,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ पुंडलिक अवसारे,तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव ,तालुका आरोग्य अधिकारी संदीप पुंड,नगरपालिकेचे नगरसेवक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
0 टिप्पण्या