लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई: काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीपातीचे
राजकारण सुरू झाले, असा थेट आरोप महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर त्यांचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात
उमटू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध मनसे असा संघर्ष सुरू होत असताना
आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या विषयावर भाष्य करत राज ठाकरे
यांना टोला हाणला आहे. राज ठाकरे यांच्यावर न बोललेले बरे, त्यांनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
या वेळी पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल
केला. केंद्र सरकारने ओबीसींची आरक्षणावरून फसवणूक केल्याचा आरोप पवार यांनी केला.
घटना दुरुस्ती केल्याने आरक्षण मिळेल हा गैरसमज असल्याचे सांगत त्यांनी केंद्र
सरकार ओबीसी समाजाची शुद्ध फसवणूक करत असल्याचे म्हटले आहे.
हिंदुत्वाला राजकारणात शह देता यावा यासाठी राज्यात जातीचे
राजकारण सुरू झाले का, असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज
ठाकरे यांना वृत्तवाहिनीच्या एका विशेष कार्यक्रमात विचारण्यात आला होता. त्यावेळी
उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचा
जन्म झाल्यानंतर या राज्यात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाला असा गंभीर आरोप केला
होता.
0 टिप्पण्या