Ticker

6/Breaking/ticker-posts

धक्कादायक: प्रियकराचा लग्नास नकार; प्रेयसीने लॉजवर बोलवून केले 'हे' भयंकर कृत्य

 

लग्नास नकार देणाऱ्या विवाहित प्रियकराचा खून.

प्रेयसीने लॉजवर बोलवून ओढणीने गळा आवळला.

आरोपी तरुणीला पिंपरी पोलिसांनी केली अटक.लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

पिंपरी: भेटण्यास टाळाटाळ करणाऱ्या व लग्नास नकार देणाऱ्या विवाहित प्रियकराचा काटा काढण्यासाठी प्रेयसीने जे कृत्य केले आहे त्याने चिंचवड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबधित तरुणीने प्रियकराला लॉजवर बोलवत ओढणीने गळा आवळून त्याचा खून केला. हा प्रकार रात्री उशिरा लॉजमधील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. याप्रकरणी संबंधित तरुणीला अटक करण्यात आली असून या तरुणीची कसून चौकशी करण्यात येत आहे.

पैंगबर मुजावर (वय ३५, रा. एमआयडीसी, भोसरी) असे खून झालेल्या विवाहित प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या २९ वर्षीय प्रेयसीला पोलिसांनी अटक केली आहे. ही तरुणी चिखलीतील साने चौक येथे राहणारी आहे. मयत पैगंबर याच्या पत्नीने याबाबत शनिवारी (१४ ऑगस्ट) पिम्परी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैगंबर आणि महिला आरोपी हे दोघेजण पूर्वी एकाच ठिकाणी कामाला होते. वर्षभरापूर्वी त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. फिर्यादीचा पती हा आरोपी तरुणीला भेटायला जात नाही. तसेच लग्न करण्यास नकार दिला. या कारणावरून त्याचा महिला आरोपीशी वाद होत होता. तरुणीने पैगंबर याला शुक्रवारी चिंचवड स्टेशन येथील व्हाइट हाऊस लॉजमध्ये भेटायला बोलावले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ओढणीने गळा आवळून त्याचा खून केला. रात्री दहा वाजताच्या सुमारास तिने पैगंबर बेशुद्ध पडल्याचे लॉज मधील कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यांनी पैगंबर यास त्वरित वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. संशयावरून पोलिसांनी पैगंबर याच्या प्रेयसीला ताब्यात घेतले. तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने खूनाची कबुली दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गनेश लोंढे याप्रकरणी तपास करीत आहेत

दरम्यान, लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून प्रेयसीने प्रियकराचा खून केल्याची ही घटना समोर आल्याने सगळेच हादरले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या