Ticker

6/Breaking/ticker-posts

पीव्ही सिंधूसाठी २ लाखांची साडी; तुम्ही पाहिला का फोटो

 
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नवी दिल्ली: नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने कांस्यपदक जिंकले. ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. याआधी सिंधूने २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते.

बॅडमिंटन कोर्टवर दिसणारी सिंधूचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या फोटोत सिंधू साडीत दिसत आहे. कोर्टवर प्रतिस्पर्धी खेळाडूंना पळवणारी सिंधूचा हा देसी अवतार सर्वांना आवडला असून त्यावर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.


प्रसिद्ध छायाचित्रकार अनिल कुमार यांनी सिंधूच्या या फोटोंचा कोलाज व्हिडियो शेअर केला आहे. ही साडी प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केली आहे. सिंधूचे हे फोटो पाहिल्यानंतर ती फक्त कोर्टवरच नाही तर फॅशनच्या बाबत देखील मागे नाही हे दिसते.


सिंधूने नेसलेल्या या साडीची किमत १ लाख ९५ हजार इतकी आहे. मनीष मल्होत्रा यांनी शेअर केलेले सिंधूचे फोटो

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या