Ticker

6/Breaking/ticker-posts

आय बी एम आर डी मध्ये आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

 ग्रामीण भागातील करोना विषयक  समस्यावर संशोधन व्हावे- पद्मश्री पवार



 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)



नगर :डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन च्या इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड रूरल डेव्हलपमेंट (आय बी एम आर डी) अहमदनगर या संस्थेमध्ये दिनांक 26 व 27 ऑगस्ट 2021 रोजी "चेन्जिंग टाइम विथ चेन्जिंग माईंड - द डिजिटल ट्रान्सफॉर्मशन इन बिसिनेस रि-इंजिनिअरीग  - पोस्ट पेनड्यामिक इरा ऑफ इंडस्ट्री 5.0" या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

 सदर परिषदेमध्ये तज्ज्ञ  व्याख्याते म्हणून पद्मश्री. पोपटराव पवार यांची उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या भाषणात आंतरराष्ट्रीय परिषदेचे महत्व विशद करताना ग्रामीण भागातील कोरोना काळातील समसेबद्दल चर्चा केली. तसेच त्या समस्या दूर करण्यासाठी कसे संशोधन केले पाहिजे या विषयी आपले विचार प्रकट केले. 

सदर परिषदेसाठी देश व विदेशातील अनेक मान्यवर उपस्थित होते. ह्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यासाठी संस्थेचे चेअरमन  राधाकृष्ण विखे पाटील , संस्थेचे विश्वस्त ऍड. वसंतराव कापरे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे महासचिव डॉ. बी. सदानंदा, संचालक (तंत्र) डॉ.पी.एम गायकवाड, उपसंचालक डॉ. अभिजीत दिवटे, उपसंचालक  सुनील कल्हापुरे व संस्थेच्या सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी आयबीएमआरडी संस्थेचे संचालक डॉ. संजय धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मेघा जैन, प्रा. गणेश अंत्रे, प्रा. अमोल बेरड, प्रा. नचिकेत देवधर आणि सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या