*देशातील पहिलीच सिंगल डोस
करोना लस
*देशात सध्या कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुतनिक
व्ही आणि मॉडर्ना लसींचा वापर
*आता करोनाविरुद्ध भारतात पाच लसींचा वापर होणार
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नवी दिल्ली : अमेरिकेची कंपनी 'जॉन्सन अँड जॉन्सन' च्या सिंगल डोस करोना लसीला
भारतात आपात्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आलीय. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया
यांनी ही माहिती दिलीय.
उल्लेखनीय म्हणजे, 'जॉन्सन अँड जॉन्सन'ची ही देशातील पहिलीच सिंगल डोस लस ठरतेय. देशात सध्या कोव्हिशिल्ड,
कोव्हॅक्सिन, स्पुतनिक व्ही आणि मॉडर्ना अशा
चार लसींचा वापर करोना लसीकरण मोहिमेत केला जात आहे. आता या चार लसींसोबत जॉन्सन
अँड जॉन्सनची सिंगल डोस करोना लसही वापरात येणार आहे.
भारतानं आपल्या लसींत आणखी एका लसीची भर
टाकली आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीला भारतात आपात्कालीन वापराची परवानगी
देण्यात आलीय. याचसोबत आतापर्यंत भारतात पाच लसींना आपात्कालीन वापराची मंजुरी
देण्यात आलीय. याद्वारे करोनाविरुद्धच्या लढाईत प्रोत्साहन देशाला प्रोत्साहन
मिळेल.
'जॉन्सन अँड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेड'नं ५ ऑगस्ट
२०२१ रोजी भारत सरकारकडे आपल्या सिंगल डोसच्या कोविड १९ विरुद्ध लढणाऱ्या लशीच्या
आपात्कालीन वापराला परवानगी मिळवण्यासाठी विनंती अर्ज दाखल केला होता.
कोणती लस किती प्रभावकारक?
*कोव्हिशिल्ड : ९० टक्के
*कोव्हॅक्सिन : ८१ टक्के
*मॉडर्ना : ९४.१ टक्के
*स्पुतनिक व्ही : ९१.६ टक्के
*जॉन्सन अँड जॉन्सन : ८५ टक्के
0 टिप्पण्या