Ticker

6/Breaking/ticker-posts

प्रा. दादासाहेब खेडकर यांचा वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा

 आगामी राजकीय भूमिकेकडे लागले  लक्ष










लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

खरवंडी कासार : वंचित बहुजन ऊसतोड मजूर कामगार संघटनेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दादासाहेब खेडकर यांनी आपल्या पदाचा व पक्षाच्या सक्रीय सभासदत्वाचा  राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिला आहे.यामुळे पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागात गेल्या एक वर्षापासून आघाडीच्या संघटना वाढीला पर्यायाने वंचीत बहुजन पक्ष वाढीला खीळ बसणार आहे.                    

येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकीचे राजकीय वारे वाहू लागल्याने पाथर्डी तालुक्या मध्ये वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे 

.याबाबत अधिक माहिती अशी की प्राध्यापक दादासाहेब खेडकर हे गत एक वर्षापासून वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर प्रदेशाध्यक्ष शिवराज बांगर यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते ऊसतोड मजुरांच्या न्याय हक्कासाठी एक वर्षापूर्वी प्राध्यापक दादासाहेब खेडकर यांनी भगवान गडाच्या पायथ्याशी प्रकाश आंबेडकर यांना बोलावून ऊस तोड मजुरांच्या मागण्यांसंदर्भात भव्य दसरा मेळावा घेतला होता तसेच पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली होती. 

परंतु अलीकडे वंचित बहुजन आघाडी हा पक्ष विचारधारेला तिलांजली देत असून पक्षाची विचारधारा सोडून एकाधिकारशाहीकडे वाटचाल करत आहे. तसेच काही विशिष्ट लोकांच्या दावणीला पक्ष बांधला गेला असल्याचे सांगत बहुजन समाजातील माळी, साळी, धनगर, वंजारी ,कोष्टी ,बंजारा आदी समाजमान्य समूहाला डावलत असल्यामुळे आपण हा राजीनामा दिला असल्याचे दादासाहेब खेडकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित करून आरोप केले.

  याबाबत लवकरच आपण आगामी राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते व दादासाहेब खेडकर यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या