Ticker

6/Breaking/ticker-posts

भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये विविध पदांची भरती; या तारखेपर्यंत करा अर्ज..

 


*९ सप्टेंबर २०२१ पर्यंत करा अर्ज

*४५ हजारपर्यंत मिळेल पगार

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

वी दिल्ली-BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार आणि इतर पात्रता निकष यासंदर्भात अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशनमध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे. ट्रेनी किंवा प्रोजेक्ट इंजिनीअर पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी बीईएलच्या अधिकृत वेबसाइट https://www.bel-india.in/ वर जाऊन ऑनलाइन अर्ज करु शकता. ९ सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये पुण्यासाठी ही भरती केली जाणार आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, एक नवरत्न कंपनी आणि संरक्षण मंत्रालयाअंतर्गत भारतातील प्रसिद्ध कंपनी आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदावारंना एक वर्षांच्या नियुक्तीवर ठेवले जाणार आहे. प्रोजेक्टची आवश्यकता आणि प्रदर्शनाच्या आधारे हा कालावधी वाढवला जाऊ शकतो. अर्ज भरताना त्यामध्ये कोणता गोंधळ असू नये. अन्यथा अर्ज रिजेक्ट केला जाईल.

या भरतीअंतर्गत प्रोजेक्ट इंजिनीअर पदाच्या एकूण ४ जागा रिक्त आहेत. ज्यामध्ये प्रोजेक्ट इंजिनीअरच्या २ जागांसाठी उमेदवाराकडे इलेक्ट्रॉनिक्स किंवा मॅकेनिकलमध्ये बीई/बीटेक असणे गरजेचे आहे. तर इतर दोन जागांसाठी प्रोजेक्ट इंजिनीअरकडे एमटेक/एमएससी इन फोटोनिक्स/ऑप्टीक्स असणे गरजेचे आहे. प्रोजेक्ट इंजिनीअर या पदांचा कालावधी २ वर्षांसाठी असून यासाठी १ ऑगस्ट पर्यंत २८ वर्षे पूर्ण ही वयोमर्यादा आहे. या पदासाठी ४० हजार पर्यंत पगार मिळणार आहे. या पदासाठी पाचशे रुपये अर्ज शुल्क आहे.

तसेच ट्रेनी इंजिनीअर (बीई/बीटेक इन इलेक्ट्रॉनिक्स) च्या ३ जागा भरल्या जाणार आहेत. एनडीए रोड, प्रशन, पुणे येथे विविष्ट कालावधीसाठी ही भरती होणार आहे. या भरतीमध्ये सरकारी नियमानुसार सवलत मिळणार आहे. ट्रेनी इंजिनीअर पदाचा कालावधी हा १ वर्षांसाठी असणार आहे. या पदासाठी १ ऑगस्टपर्यंत २५ वर्षे वयोमर्यादा असणार आहे. या पदासाठी २८ हजार रुपये पगार मिळणार आहे. या पदासाठी २०० रुपये अर्ज शुल्क आहे.

आरक्षित वर्गासाठी अर्ज शुल्कामध्ये सवलत देण्यात आली आहे. एक उमेदवार एका पोस्टसाठीच अर्ज करु शकतो. उमेदवारांनी आपला अर्ज contengr-1@bel.co.in या ईमेल आयडीवर पाठवायचा आहे. तसेच कागदपत्रांची प्रिंट सिनिअर डीवाय जनरल मॅनेजर,(HR&A), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड,एनडीए रोड, पशन, पुणे-४११०२१ या पत्त्यावर पाठवायचा आहे. ९ सप्टेंबरपर्यंत आलेल्या अर्जांचाच भरतीसाठी विचार केला जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या