Ticker

6/Breaking/ticker-posts

कृषी संजीवनी पुरस्कार प्राप्त ज्ञानेश्वर दौंड यांचा जन्म गावी झाला गौरव ...

 











लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

खरवंडी कासार : उत्कृष्ठ व चागले काम केल्या मुळे शासणा कडुन मिळालेल्या पुरस्कार पेक्षा जन्मभुमीतिल ग्रामस्थानी केलेला सन्मान माझ्या साठी मोठा आहे आहे आणि हाच माझा मोठा गौरव आहे  असे प्रतिपादन  ज्ञानेश्वर दौंड यांनी केले 

पाथर्डी कृषी विभागातील येळी येथे कार्यरत असलेले कृषी सहाय्यक ज्ञानेश्वर दौंड यांना महाराष्ट्र  कृषी विभाग आयुक्त कार्यालय मार्फत कृषी संजीवनी पुरस्कार मिळाल्याबद्दल  त्यांच्या जन्मगावी काटेवाडी व भगवानगड पंचक्रोशीतिल  ग्रामस्थांच्यावतीनेभव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते .

 यावेळी तुळजाभवानी संस्थान चे महंत  ह भ प संतोष खताळ  टाकळी मानुर कृषी मंडलाधिकारी रामदास मडके मुख्याध्यापक संघाचे जिल्हाउपध्यक्ष मिथुन डोंगरे ग्रामपंचायत सदस्य सचिन ढोले दादासाहेब खेडकर जय भगवान महासंघाचे अध्यक्ष अनिल दौंड रामजी ढाकणे शिवनाथ ढाकणे अभिमान बडे विनोद घुले संदीप घुले शेषराव ढाकणे पांडुरंग ढाकणे प्रभाकर ढाकणे आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी बोलताना दादासाहेब खेडकर यांनी ज्ञानेश्वर दौंड हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असल्याने कृषी क्षेत्रातील समूह शेती शेती शाळा माती परीक्षण तसेच पारंपरिक शेती आणि आधुनिक शेती विविध तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना दुप्पट पिक घेता येत असल्याचे विविध प्रयोग कृषी विभागाच्या मार्फत केले आणि शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामातील पीक घेण्याच्या संदर्भात तसेच फळबाग रोपवाटीका या माध्यमातून शेतीला पूरक गट शेती केल्याने प्रगतशील शेतकरी शेती क्षेत्रामध्ये क्रांती घडू शकतो असे सांगितले येणाऱ्या काळामध्ये शेती क्षेत्रामध्ये संशोधन करून केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम ज्ञानेश्वर दौंड यांनी करावे असेही दादासाहेब खेडकर यांनी मनोगत व्यक्त केले .

यावेळी शिक्षक नेते मिथुन डोंगरे यांनी ज्ञानेश्वर दौंड यांच्यासारखा कृषी मित्र भगवानगड परिसराला लाभल्याने निश्चितच ऊसतोड मजूर भाग असलेला दुष्काळी परिसराची ओळख समूहांनी गट शेती केल्याने प्रगतशील शेती करण्यासाठी ज्ञानेश्वर दौंड हे शेतकऱ्यांना कृषी संजीवनी देतील असे मत व्यक्त केले ह भ प संतोष खताळ महाराज यांनी ज्ञानेश्वर दौंड यांना भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या सूत्रसंचालन अर्जुन ढाकणे यांनी तर आभार माऊली उगलमुगले यांनी मानले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या