Ticker

6/Breaking/ticker-posts

Indian Coast Guard 2021: असिस्टंट कमांडंट परीक्षेसाठी प्रवेश पत्र जाहीर, असे करा डाऊनलोड

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 नवी दिल्ली : Indian Coast Guard 2021: इंडियन कोस्ट गार्डने (Indian Coast Guard) असिस्टंट कमांडट पदाच्या परीक्षेचे प्रवेश पत्र जाहीर केले आहे. एकूण ५० पदांसाठी होणाऱ्या या परीक्षेत अर्ज केलेले उमेदवार ते आपले प्रवेश पत्र अधिकृत वेबसाइटवरुन डाऊनलोड करु शकतात. त्यासाठी उमेदवारांना joinindiancoastguard.gov.in या वेबसाइटवर जावे लागणार आहे. किंवा बातमीखाली दिलेल्या लिंकवर जाऊन दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेश पत्र डाऊनलोड करु शकता.

प्रवेश पत्र असे करा डाऊनलोड
उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन पॉप अप होताना दिसेल. यामध्ये सहायक कमाडंट पदासाठी प्रवेश पत्र २१ जुलैपासून उपलब्ध आहे. यानंतर उमेदवाराने प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा. प्रवेश पत्र मिळविण्यासाठी उमेदवाराला आपला नोंदणी क्रमांक, ईमेल आयडी आणि जन्म तारीख टाकावी लागणार आहे. भविष्यातील उपयोगासाठी प्रवेश पत्राची प्रिंट काढून ठेवावी.


अधिकृत वेबसाइटवर एक महत्वपूर्ण सुचना जाहीर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी सहायक कमांडटच्या प्रारंभिक परीक्षेसाठी मुंबई हे परीक्षा केंद्र निवडले आहे त्यांना डहाणूमध्ये परीक्षा द्यावी लागणार आहे. इंडियन कोस्ट गार्डच्या अधिकृत नोटीसनुसार करोना नियमांच्या पार्श्वभूमीवर आणि प्रशासनाच्या नियमांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षार्थींना नव्या परीक्षा केंद्राचा पत्ता जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या