*सीबीएसई बारावीचा निकाल लांबणीवर
*निकालासाठी शाळांना
मुदतवाढ देण्यात आली
*अधिकृत वेबसाइटवर मिळेल माहिती
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
तसेच सीबीएसईने दहावी आणि बारावी
परीक्षांसंदर्भात देखील सूचना दिली आहे. खासगी विद्यार्थ्यांसाठी होणारी परीक्षा
ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ मध्ये घेतली जाणार आहे. ही परीक्षा १६ ऑगस्ट २०२१ पासून सुरु
होऊन १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत असणार आहे. रिझल्टची घोषणा देखील कमीत कमी वेळेत होणार
आहे.
सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार, यूजीसीसोबत मिळून कॉलेज प्रवेशाचे
वेळापत्रक तयार केले जात आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार केला जात
आहे. यासोबतच खासगी शाळांचा देखील विचार केला जाणार आहे. यूजीसीने २०२० मध्ये
देखील असेच केले होते.
नियमित विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षा
रद्द केल्यानंतर खासगी विद्यार्थ्यांची परीक्षा का घेतली जातेय? नियमित विद्यार्थ्यांप्रमाणे खासगी
विद्यार्थ्यांची परीक्षा का रद्द केली नाही? असा प्रश्न
उपस्थित केला जात होता. यावर बोर्डाने स्पष्टीकरण दिले आहे.
नियमित विद्यार्थ्यांप्रमाणे खासगी
विद्यार्थ्यांचा डेटा शाळांकडे किंवा बोर्डाकडे उपलब्ध नाही. त्यांची यूनिट टेस्ट, मिड टर्म, प्री
बोर्ड एक्झाम असे काही झाले नाही. अशावेळी विना बोर्ड एक्झाम त्यांचा निकाल तयार
करणे शक्य नाही. ही बाब सुप्रीम कोर्टाच्या समोर देखील ठेवण्यात आली होती.
0 टिप्पण्या