Ticker

6/Breaking/ticker-posts

CA परीक्षा नेपाळमध्ये रद्द; भारतीय विद्यार्थ्यांचे मजेशीर मीम्स व्हायरल

 *या विद्यार्थ्यांचे जुलै परीक्षांचे ऑप्ट आऊट संस्थेद्वारे

*भारतीय विद्यार्थ्यांचे मजेशीर मीम्स व्हायरल







लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

काठ्मांडू : CA Inter, Final Exams 2021:  इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड एकाउंटंट्स ऑफ इंडिया’ (icai) ने सीए इंटरमिडीएट आणि फायनल जुलै परीक्षांचे आयोजन सोमवार ५ जुलैपासून केले आहे. मात्र काही केंद्रांवर CA परीक्षा रद्द केल्या आहेत. यासंदर्भात संस्थेद्वारा रविवार ४ जुलै २०२१ रोजी रात्री एक महत्त्वाची अपडेट दिली होती. यानुसार, करोना महामारीमुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे ५ ते २० जुलै २०२१ या कालावधीत आयोजित काठमांडू (नेपाळ) केंद्रावर होणाऱ्या सीए फायनल (ओल्ड आणि न्यू स्कीम), इंटरमीडिएट (आयपीसी) आणि इंटरमीडिएट परीक्षा रद्द करण्यात आल्या. आयसीएआयने नेपाळमध्ये करोना महामारीच्या वाढत्या संसर्गामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

ऑप्ट-आउटसाठी अर्ज करणे आवश्यक नाही

आयसीएआयने सीए फायनल आणि इंटर परीक्षा काठमांडू येथील केंद्रांवर रद्द करण्यात आली. या केंद्रावरील उमेदवारांना जुलै सीए परीक्षेसाठी ऑप्ट-आउट पर्यायासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असं आयसीएआयने कळवलं आहे. या विद्यार्थ्यांचे जुलै परीक्षांचे ऑप्ट आऊट संस्थेद्वारे करण्यात येईल. विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, सीए परीक्षांच्या अपडेटसाठीसीए परीक्षा पोर्टल, icaiexam.icai.org ला भेट देत राहावी.

भारतीय विद्यार्थ्यांचे मीम्स

करोनाच्या पार्श्वभूमीवर सीए परीक्षा रद्द व्हाव्यात, अशी देशातील हजारो विद्यार्थ्यांची मागणी होती. या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल झाली होती. पण कोर्टाच्या निर्देशानुसार उमेदवारांना ऑप्ट आउटचा पर्याय देत संस्थेने परीक्षा नियोजित वेळेत आयोजित केली. मात्र, या दरम्यान, नेपाळमधील लॉकडाऊनमुळे काठमांडू सेंटरवरची परीक्षा रद्द झाली. यानंतर ट्विटरवर अनेक गंमतीशीर मीम भारतीय विद्यार्थ्यांनी पोस्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या