Ticker

6/Breaking/ticker-posts

‘विना सहकार, नही उद्धार’ केंद्र सरकारने स्थापन केले 'हे' नवीन मंत्रालय

 लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 नवी दिल्लीः मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाच्या एक दिवस आधी केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने ऐतिहासिक पाउल उचलत नवीन स्वतंत्र मंत्रालय तयार केले आहे. ' मिनिस्ट्री ऑफ को-ऑपरेशन' म्हणजेच केंद्र सरकारने 'सहकार मंत्रालय'ची स्थापन केले आहे. ' सहकारातून समृद्धी' हे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्राने हे स्वतंत्र मंत्रालय बनवले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पावेळी या मंत्रालयाची घोषणा केली होती. यानुसार सरकारने आपले आश्वासन पूर्ण केले आहे.

नव्या मंत्रालयामुळे देशातील सहकार चळवळीला बळ देण्यासाठी प्रशासकीय, कायद्यांचा आणि धोरणात्मक रचना उपलब्ध केली जाईल. सहाकरी संस्थांना स्थानिक पातळीवर मदत करण्यासाठी कामी येईल. याद्वारे सहकारी संस्थांबद्दल नागरिकांमधील विश्वास वाढून त्यांचं नातं अधिक घट्ट होऊ शकेल, असं सांगण्यात येत आहे.

देशात सहकारावर आधारित आर्थिक विकास मॉडेलचा संबंध आहे. या मॉडेलमध्ये प्रत्येक सदस्य जबाबदारीने काम करतो. मंत्रालयाकडून सहकारी संस्थांना व्यवसाय सुलभता म्हणजे ईज ऑफ डुइंग बिजनेसची प्रक्रिया सोपी करते. तसंच मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्हच्या (एसएससीएस) विकासासाठी काम करेल.

केंद्रातील मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि फेरबदल बुधवारी संध्याकाळी होण्याची शक्यता आहे. या संदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाही. पण बुधवारी संध्याकाळी ६ वाजता राष्ट्रपती भवनात अशोक हॉलमध्ये शपथविधी सोहळा पार पडेल, अशी चर्चा सुरू आहे. यावेळी करोना संबंधी प्रोटोकॉलचे पालन काटेकोरपणे केले जाईल.

महाराष्ट्र हे सहकार चळवळीचे उगमस्थान


सहकार म्हटलं की महाराष्ट्राचं नाव सर्व प्रथम येतं. महाराष्ट्रातील उद्योग, व्यवसाय आणि साखर कारखान्यांसह शैक्षणिक संस्था या सुरवातीचा काळात सहकारी चळवळीतून उभ्या झाल्या. यातून महाराष्ट्राच्या प्रगतीला चालना मिळाली. सहकारी चळवळीतून अनेक साखर कारखाने स्थापन झाले. यातून शेतकऱ्यांना उत्पन्न आणि रोजगारही निर्माण झाला. विना सहकार, नाही उद्धार, असं म्हटले जाते. विठ्ठलराव विखे-पाटील यांनी महाराष्ट्राला सहकारी चळवळीचा यशस्वी मंत्र दिला. महाराष्ट्रानंतर हा प्रयोग गुजरातमध्ये वर्गीस कुरियन यांनी यशस्वी करून दाखवला. अमुल दुग्धोत्पादन सहकारी तत्वार चालवून त्यांनी तिथे क्रांती घडवली. रॉबर्ट ओवेन यांना आधुनिक सहकारी चळवळीचे जनक माले जाते. त्यांनी सहकार चळवळीला एक दिशा दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या