Ticker

6/Breaking/ticker-posts

मुस्लिमांशी लग्न केल्यानंतरच धर्म का बदलावा लागतो, आमिरच्या घटस्फोटावर कंगनाचा सवाल..

 *अभिनेत्री कंगनाने दिले नवीन वादाला निमंत्रण?

*आमिर खान- किरण राव घटस्फोटावरून कंगनाने मुस्लिम समुदायवर उपस्थित केले प्रश्न.

*इन्स्टाग्रामवर कंगनाने व्यक्त केले मत.
लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री  कंगना रणौत सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते. कंगना तिच्या सोशल मीडियावरून सिनेमांबरोबरच सामाजिक, राजकीय प्रश्नांवरही आपली मतं व्यक्त करत असते. अनेकदा तिची ही मते वादग्रस्त असल्याने त्यावरून वादंग उठतो आणि तिला ट्रोलही केले जाते. आता देखील कंगनाने आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट झाल्याचे निमित्त साधत मुस्लिम समुदाया संदर्भात प्रश्न विचारत त्यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नवीन वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत.


काय म्हणाली कंगना

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट स्टोरीवर एक प्रदीर्घ नोट लिहिली आहे. तिने लिहिले की, ' एक काळ असा होता की पंजाबमधील कुटुंबांमध्ये एका मुलाला हिंदू तर दुसऱ्या मुलाला शीख धर्माचे पालन करावे लागायचे. तशी परंपरा होती. परंतु अशी परंपरा हिंदू आणि मुस्लिम, मुस्लिम आणि शीख समाजामध्ये नाही. आमिर खान सरांनी घटस्फोट घेतल्याचे मला आश्चर्य वाटले. त्यानंतर असा विचार मनात आला की, हिंदू आणि मुस्लीम आंतरधर्मिय लग्नातून जन्माला आलेली मुले नेहमीच मुस्लिम का होतात. महिला हिंदू धर्माचे पालन का करू शकत नाही. काळानुसार आपल्याला या गोष्टीही बदलायला हव्यात. ही एक जुनी प्रथा आहे. जर एखाद्या कुटुंबामध्ये हिंदू, जैन, बौद्ध, शीख आणि नास्तिक एकत्र राहू शकतात तर मग मुस्लिम का नाही राहू शकत? एखाद्या मुस्लिम व्यक्तीशी लग्न झाल्यानंतर आपल्याला धर्म का बदलावा लागतो?'


शनिवारी आमिर खान आणि किरण राव यांनी संयुक्त निवेदनाद्वारे ते दोघे विभक्त होत असल्याचे जाहीर केले. आमिर आणि किरण यांचे २००५ मध्ये लग्न झाले होते. या दोघांना आझाद हा मुलगा आहे. याआधी आमिरने १९८६ मध्ये रीना दत्तासोबत प्रेमविवाह केला होता. परंतु या दोघांचा २००२ मध्ये घटस्फोट झाला. आमिर आणि रीनाला जुनैद आणि आयरा ही दोन मुले आहेत.

दरम्यान, कंगनाच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचे तर तिचा 'थलायवी' हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. त्याशिवाय ती 'धाकड', 'तेजस' या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. कंगनाने अलिकडेच तिच्या प्रॉडक्शन हाऊसतर्फे एका सिनेमाची घोषणा केली आहे. हा सिनेमा माजी पंतप्रधान इंदिरा गांदी आणि आणीबाणी यावर आधरित आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या