Ticker

6/Breaking/ticker-posts

'...तर ‘आधी आधी मला मुख्यमंत्री करा अन मग प्रश्न विचारा' - छत्रपती संभाजीराजे

 

*संभाजीराजेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

*आरक्षणावरून प्रश्न विचारणाऱ्यांना दिलं उत्तर







लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 बीड: खासदार संभाजीराजे हे विविध जिल्ह्यांमध्ये जात मराठा समाजाच्या आरक्षण आणि इतर प्रश्नांबाबत संवाद मेळावे घेत आहेत. याच मेळाव्यासाठी बीडमध्ये गेलेल्या संभाजीराजे यांच्या भाषणात काही काळासाठी गोंधळ निर्माण झाला होता. संभाजीराजे यांचं भाषण सुरू असताना संभाजी ब्रिगेडचे काही कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी आले आणि मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजेंना प्रश्न विचारू लागले. या कार्यकर्त्यांना उत्तर देताना संभाजीराजेंनी केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.


मराठा आरक्षणावरून प्रश्न विचारणाऱ्या कार्यकर्त्यांना संभाजीराजे म्हणाले की, 'हा प्रश्न तुम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि आधीच्या मुख्यमंत्र्यांना विचारा. पण ते तुम्हाला उत्तर देणार नाहीत. मला प्रश्न विचारायचा असेल तर या संभाजीराजेंना मुख्यमंत्री करा आणि मग प्रश्न विचारा. असं जर झालं तर नक्कीच बहुजांनाच्या हिताचं काम केल्याशिवाय राहणार नाही.'


संभाजीराजे यांनी खरंतर मराठा आरक्षणावरुन त्यांच्याकडे बोट दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना उत्तर देताना मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केलं आहे. मात्र त्यांच्या मनात खरंच मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षा आहेत का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.



आणखी काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

' आरक्षणाबरोबरच इतर मागण्यादेखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. या  मागण्या मान्य करून घेण्यासाठी समाजाने कोल्हापूर येथे मूक आंदोलन केले. याची दखल घेऊन शासनाने आपल्या मागण्यांबाबत बैठक घेऊन बहुतांश मागण्या मान्य केल्या व काही मागण्यांवर अंतिम निर्णय घेण्यासाठी अवधी मागितला आहे. तरीदेखील या सर्व मागण्या पूर्णतः मान्य होऊन त्यांची संपूर्ण अंमलबजावणी होण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे,' असं आवाहन संभाजीराजेंनी समाजबांधवांना केलं आहे.

'मा. सर्वोच्च न्यायालयाने १०२ व्या घटनादुरूस्तीवर पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर आता शिल्लक असलेला पर्याय म्हणजेच, ३४२ अ नुसार राष्ट्रपतींकडे राज्य शासनाने शिफारस करून त्या माध्यमातून आरक्षण मिळविणे. यासाठी देखील समाजाने एकजुटीने पाठपुरावा करणे गरजेचे आहे,' असंही संभाजीराजे यावेळी म्हणाले.

 

मराठा तरुणांची भावना...

* सारथी संस्थेला १ हजार कोटी द्या.
* अण्णासाहेब महामंडळांची मर्यादा वाढवी.
*मराठा-कुणबी समाजाचे वसतिगृह तयार करा.
*ओबीसींप्रमाणे मराठ्यांना शैक्षणि सवलती द्या.
-*मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घ्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या