Ticker

6/Breaking/ticker-posts

सराफ बाजारांमध्ये शशस्त्र पोलीसांचा बंदोबस्त वाढवावा : संतोष वर्मा

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नगर  - लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये सराफ सुवर्णकार व्यापारींना लुटण्याचे प्रकार वाढत आहेत. दरोडेखोर दिवसा ढवळ्या सराफांच्या पेढ्यांवर दरोडे टाकत लाखो रुपयांचे सोने लुटत आहेत.अशा घटना थांबण्यासाठी राज्यातील सराफ बाजार उघडा असे पर्यत तेथे शशस्त्र पोलीसांचा बंदोबस्त वाढवण्यात यावाअशी मागणी भारतीय सुवर्णकार समज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष वर्मा यांनी राज्याचे पोलीस महासंचालक व नगरच्या जिल्हाधिकारी यांच्या इमेल द्वारे पाठवलेल्या निवेदनाने केली आहे.

 निवेदनात म्हंटले आहे कीलॉकडाऊन मुळे अनेकांचे रोजगार गेल्याने चोऱ्या दरोड्यांचे प्रकार वाढत आहेत. राज्यातील मुंबईपुणेनांदेडजळगाव आदी ठिकाणी दरोडे पडले आहेत. करोनाच्या आलेल्या लाटे मध्ये सराफ व्यावसायिकाचे आधीच कंबरडे मोडले आहे. सोन्याचे व्यवहार कमी झाल्याने पूर्ण राज्यात सराफ व्यावसायिक अडचणीत सापडला आहे. 

आता या संकटात चोऱ्या, दरोडे व लुटमारीच्या घटनांची भर पडत आहे. सराफ बाजारांना व व्यावसायिकांना तातडीने संरक्षण देणे आवश्यक आहे. चोऱ्या, दरोडे व लुटमारीच्या घटना थांबण्यासाठी सराफ बाजारात शशस्त्र पोलीसांचा बंदोबस्त वाढवावा. अशी मागणी करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या