Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्हाभरात धो - धो पाऊस.. पेरण्यांना वेग येणार..

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 अहमदनगर : बऱ्याच दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने काल दुपार पासूनच नगर श्हर, परिसर व जिल्हाला चांगलेच झोडपले.सकाळपासूनच पावसाचे वातावरण तयार झाले होते.काही वेळ पावसाचा शिडकाव झाला व त्यानंतर पावसाने जोरदार बॅटिंगला सुरवात केली.  मेघगर्जनेसह आलेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले.

 

बऱ्याच प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुमारे दोन तास चाललेल्या या  जोरदार पावसाने  नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली होती.रस्त्याच्या कडेला मिळेल तिथे नागरिक आश्रयाला थांबले होते.

विजांचा कडकडाट अन ढगांचा गडगडाटात अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांसह भाजीविक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. सायंकाळी पाच नंतरही  पाऊस रिमझिम स्वरूपात चालूच होता.दिवसभर असणारा उकाडा,वाढलेली गरमी असह्य होत असतानाच दुपारीच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला होता.समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण काहीसे दूर झाले आहे. राहिलेल्या पेरण्यांना वेग यईल.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या