Ticker

6/Breaking/ticker-posts

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित डॉ. सुजय विखे उद्या दाखल करणार उमेदवारी अर्ज : अॅड. अभय आगरकर

 


लोकनेता  न्यूज

    (ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

अ. नगर । प्रतिनिधी : नगर दक्षिणचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील कधी आणि कशा पद्धतीने अर्ज दाखल करणार याची उत्सुकता असताना , राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थित हजारों कार्यकर्त्यांसह उद्या २२ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार  असल्याची माहिती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी  दिली .


 आगरकर यांनी सांगितले की, २२ एप्रिल रोजी डॉ. सुजय विखे पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालय येथे ११ वाजता आपला अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील  यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 


त्याचबरोबर यावेळी आमदार मोनिका राजळे, आमदार प्रा. राम शिंदे, जिल्हाबॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले, माजी मंत्री तथा आमदार बबनराव पाचपुते, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार चंद्रशेखर कदम,माजी आमदार चंद्रशेखर घुले, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवाले, अनिल शिंदे यांच्यासह सर्व मित्र पक्षाचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. 


छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवाद करून आपल्या मिरवणुकीने  माळीवाडा वेस येथून विशाल गणपतीचे दर्शन घेत, पंच पीर चावडी मार्गे माणिक चौक, भिंगारवाला चौक, तेलीखुंट, चितळे रोड, स्वा. वीर सावरकर चौक, दिल्लीगेट ते निलक्रांती चौक येथे मिरवणुकीची सांगता होईल.यावेळी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी आणि सत्कार केला जाणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप, महायुती आणि घटक पक्ष, मित्र, पक्षाचे हजारो कार्यकर्ते यावेळी हजर राहणार असल्याचे आगरकर यांनी सांगितले. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या