Ticker

6/Breaking/ticker-posts

ना हॉल ना मैदान ! चक्क कचरा डेपोवर पार पडले नवविवाहित जोडप्याचे लग्न..!

 








लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 परभणी : डम्पिंग यार्ड म्हणताच दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य अस काहीसं चित्र समोर येतं. पण परभणी जिल्ह्यातील मानवत येथील कचरा डेपो मात्र प्रेक्षणीय स्थळ बनले आहे. एवढंच काय कमी होतं म्हणून या ठिकाणी आता चक्क विवाह सोहळे आयोजित करून पालिके तर्फे नागरिकांना स्वच्छतेचे महत्व समाजवून सांगितले जाऊ लागले आहे. या डम्पिंग ग्राउंड येथे आज आगळ्या वेगळा विवाह सोहळा संपन्न झाला.


मानवत शहरातील नागरिकांची लगबग सुरू आहे. सगळे एकत्र जमून गावातच होणाऱ्या विवाह सोहळ्यास निघाले आहेत. त्यात सामाजिक अंतर आणि मास्कचा पुरेपूर वापर दिसून येत होता. नवरदेव कारमध्ये निघाले आणि थेट गावाच्या बाजूला असलेल्या कचरा डेपोवर पोहोचले. कारण मागील वर्षभरापासून मानवत पालिकरने स्वच्छते विषयी घेतलेल्या पावलांची नोंदच या सोहळ्याच्या माध्यमातून शहरवासीय घेत आहेत. शहरात काही वर्षांपूर्वी मोठी कचरा समस्या होती. इतर गावांप्रमाणे दुर्गंधी आणि घाण ही जणू पाचवीलाच पुजलेली. पण पालिकेने निर्णय घेत कचरा व्यवस्थापणाला सुरवात केली आणि पाहता पाहता शहराचे स्वरूप बदलले.

अनिल आणि पुर्वा या दोघांचा सोहळा आज या स्वच्छ कचरा डेपोवर पार पडला. नव दाम्पत्याने आधी घनकचरा यंत्रेची विधिवत पूजा केली. लग्नास आलेल्या शेतकऱ्यांना कंपोस्ट खत भेट देत, वेगळेपण ही जपले. लग्न झालेल्या नवदाम्पत्यासह, सोहळ्यास उपस्थित असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर या आगळ्या सोहळ्याने आनंद दिसून आला. या अनोख्या विवाह सोहळ्याने समाजात स्वछतेविषयी एक वेगळी शिकवण दिली अस म्हणलं तर चूक ठरणार नाही.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या