Ticker

6/Breaking/ticker-posts

शहरातील पाणी पुरवठा तात्काळसुरळीत करण्‍याचे आ.संग्राम जगताप यांचे आदेश

 विस्‍कळीत पाणी पुरवठया संदर्भात एमएसईबी व मनपाची आ. जगताप यांनी बोलविली तातडीची बैठक






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अ.नगर -  मळा धरण व विळद पंपिग स्‍टेशन येथे गेल्‍या 20 दिवसा पासून दररोज एमएसईबीचा खंडीत होत असलेला विज पुरवठयामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्‍कळीत  होऊन नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. अनेक दिवसांचा कालावधी उलटल्‍यामुळे नागरिकांची पाण्‍यासाठी हाल होत आहे. त्‍यामुळे खंडीत वीज पुरवठा व पर्यायाने विस्‍कळीत झालेला पाणी पुरवठा तात्काळ  सुरळीत करावा असे आदेश शहराचे आमदार संग्रामभैया जगताप यांनी दिले.

याबाबत आज तातडीची बैठक बोलावून एमएसईबी व मनपाला उपाय योजना करण्‍याच्‍या सुचना केल्‍या. यावेळी मा.आयुक्‍त श्री.शंकर गोरे, एमएसईबीचे मुख्‍य कार्यकारी अभियंता श्री.सांगळे, उपायुक्‍त श्री.यशवंत डांगे, जल अभियंता श्री.परिमल निकम, पाणी पुरवठा विभाग प्रमुख श्री.रोहिदास सातपुते, श्री.रोहोकले, आदीसह अधिकारी वर्ग उपस्थित होते. 

आ. जगताप यांनी एमएसईबीचे मुख्‍य कार्यकारी अभियंता श्री सांगळे यांचेकडे मुळाधरण व विळद येथे लवकरात लवकर एक्‍सप्रेस फिडर बसविण्‍याच्‍या सुचना केल्‍या. मनपाने तुमच्‍याकडे 2 कोटी 40 लाख रूपये भरले असून या कामाला लवकरात लवकर सुरूवात करा. जेणे करून वारंवार होत असलेला विज पुरवठा सुरळीत राहण्‍यास मदत होईल. व नागरिकांना वेळेत पाणी मिळू शकेलं.

मुळा धरण व विळद येथे विज मंडळाकडून होणारा विज पुरवठा दररोज खंडीत होत आहे. काही मिनीटांसाठी वीज पुरवठा जरी खंडीत झाला तरी मुळानगर, विळद व नागापूर येथील कार्यरत पंपीग स्‍टेशन येथून होणारा पाणी उपसा बंद पडतो. त्‍यामुळे शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होण्‍यासाठी सुमारे 4-5 तासाचा अवधी लागतो. त्‍यामुळे शहरातील वितरण व्‍यवस्‍थेच्‍या पाण्‍याच्‍या टाक्‍या व्‍यवस्थित भरता येत नाही. पर्यायाने शहरात नियमीत व पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करण्‍यास अडचण निर्माण होत आहे. त्‍यामुळे पदाधिकारी, नगरसेवकांना मनपा अधिकारी व कर्मचारी यांना नागरिकांच्‍या रोषाला सामोरे जावे लागते. 

खंडीत वीज पुरवठयामुळे निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेता शहर पाणी पुरवठा योजनेकरितेचा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्‍याच्‍या दृष्टिकोनातून एमएसईबी विभागाचे स्‍वतंत्र सक्षम पथक सुसज्‍ज ठेवणे व आपत्‍कालीन परिस्थितीमध्‍ये मनपाशी समन्‍वय ठेवून तातडीने समस्‍याचे निवारण करून वीज पुरवठा सुरळीत ठेवणे बाबत उपाय योजना कराव्‍यात. वीज वितरण कंपनीने दुरूस्‍तीच्‍या कामासाठी शटडाऊन दिल्‍यानंतरही खंडीत विज पुरवठयाची मालिका सुरूच आहे. यासावळया गोंधळामुळे नागरिकांची पाण्‍यावाचून हाल होत आहे. तरी पुढील काळात वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा सुरळीत करावा व शहरातील विस्‍कळीत झालेल्‍या पाणी पुरवठयाचे नियोजन करून नागरिकांना पाणी पुरवठा करावा. अशा सक्त सूचना यावेळी आ. जगताप यांनी अधिकर्यान केल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या