Ticker

6/Breaking/ticker-posts

खंडाळा येथील कुंटणखान्यावर छापा ; नगर तालुका पोलिसांची धडकेबाज कारवाई : 3 परप्रांतीय मुलींची सुटका

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगर :  नगर तालुक्यातील  खंडाळा येथील  हॉटेल राजयोगमध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकून तीन परप्रांतीय मुलींची सुटक करुन दोनजणांना अटक करण्यात आली आहे. ही धडकेबाज कारवाई नगर तालुका  सहाय्यक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी केली आहे.

  याबाबत समजलेले माहिती अशी की, नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांना नगर तालुक्यातील  खंडाळा गावाच्या शिवारात नगर -दौड रोडवरील  असणारे हॉटेल राजयोगमध्ये संगनमताने आपले स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी  हॉटेलमध्ये परप्रांतीय मुलीना देहविक्री करण्यासाठी बोलावून घेऊन त्याचे मार्फतीने गैरमार्गाने देहविक्री करुन कुंठणखाना चालवीत आहे, अशी माहिती मिळाली होती.या माहितीनुसार ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी श्री अजित पाटील यांच्यासह नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पोलीस पथकाने छापा टाकला.

 या छाप्यामध्ये तीन परप्रांतीय मुली मिळवून आल्या. त्याना स्नेहालय येथे पाठवले आहे. दरम्यान, हाॅटेल मालक व मुलगा याना पिटा कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे. 500  रु.च्या 14 100 रु.दराच्या 15 नोटा असे एकुण 8 हजार 500 रुपये  जप्त करण्यात आले. हाॅटेल मालक व मुलगा यांना अटक करून  नगर तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप बोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु.रजि.नं. 385/2021 स्त्रीया व मुलींचा अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा सन 1956 चे कलम 3,4,5 प्रमाणे नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील कारवाई नगर तालुका सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप करत आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या