Ticker

6/Breaking/ticker-posts

पाच गावांना मंत्री तनपुरे यांच्याकडून व्यायामाचे साहित्य

 



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 पाथर्डी: राहुरी नगर पाथर्डीचे आमदार व राज्याचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नातून अंतर्गत व्यायाम शाळा विकास योजनेमधून पंधरा ग्रामपंचायतींना व्यायामाचे   प्रत्येकी  ५ लाख रुपयांचे साहित्य देण्यात आले असल्याची माहिती माजी सभापती संभाजी पालवे यांनी दिली.

पाथर्डी तालुक्यातील भोसेलोहसरराघूहिवरेकोल्हारशिरापूर या गावांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे व्यायामाचे साहित्य देण्यात आले .यामध्ये राहुरी तालुक्यातील दहा गावांचा देखील समावेश आहे. तसेच सर्वसाधारण जिल्हा योजना अंतर्गत व्यायाम शाळा विकास योजनेमधून प्रत्येकी पाच लाख रुपये खर्चाचे नगर तालुक्यातील वारूळवाडी व राहुरी तालुक्यातील सडे या दोन गावासाठी देखील व्यायामाचे साहित्य देण्यात आले आहे. एकूण सतरा  ग्रामपंचायतींना हे व्यायामाचे साहित्य देण्यात आले असून यासाठी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे .

 

पाथर्डी तालुक्यातील पाच गावांना व्यायामाचे साहित्य दिल्याबद्दल सरपंच विलास टेमकर, युवानेते अशोक टेमकर, उपसरपंच संदीप साळवे, राजू टेमकर, लोहसर गावचे युवानेते देवेंद्र गीते, ग्रामपंचायत सदस्य सुखदेव गीते,प्रमोद दगडखैर, प्रवीण रोमन, संदीप गीते, राघूहिवरेचे कांता गोरे, अण्णासाहेब होंडे, दिलीप कुरे, कोल्हारचे सरपंच शिवाजी पालवे, उपसरपंच कारभारी गर्जे, आनिता नेटके, प्रवीण पालवे, सिद्धेश पालवे, रवींद्र पालवे, गोरख मेजर आदींनी ना.
तनपुरे यांचे आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या