Ticker

6/Breaking/ticker-posts

पाऊस, पिक-पाणी, कोरोनाचं संकट, राजकारणाची परिस्थिती, भेंडवळच्या भविष्यवाणीत काय काय दडलय ?

 







लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

बुलडाणा : देशासह राज्यातील पाऊस, शेती आणि देशातील विविध विषयांवर भेंडवळच्या भविष्यवाणी अंदाज वर्तवणाऱ्या   अक्षय्य तृतीयाच्या दिवशी पुन्हा झालीय. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे पीक-पाणी, पाऊसमान, देशासह राज्यातली भविष्यातील राजकीय परिस्थिती याबाबतचा अंदाज वर्तवला जातो. यंदा मात्र लॉकडाऊनमुळे मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीत घटमांडणी करून त्यातून झालेल्या हालचालीवरुन भविष्यवाणी जाहीर करण्यात आलीय. त्यानुसार यावर्षी पाऊस हा सर्वसाधारण राहणार असून देशावर, महामारी आणि आर्थिक संकट येणार आहे तसंच घुसखोरीबद्दलची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

 

साधारण पाऊस, नैसर्गिक आपत्ती, आर्थिक स्थिती कमकुवत

गेल्या 350 वर्षांपासून भेंडवळ येथे भविष्यवाणी वर्तवण्यात येते. यंदा लॉकडाऊनमुळे ही परंपरा खंडीत होऊ नये म्हणून केवळ चंद्रभान महाराज यांच्या वंशजांसह पाच लोकांनी अक्षय्य तृतीयेला सायंकाळी भेंडवळ येथे घट मांडणी केली आणि आज सकाळी सूर्योदयापूर्वी त्या घट मांडणीचे निरीक्षण करत त्यानुसार या वर्षीचे भाकीत वर्तविले.

 त्यानुसार यंदा राज्यात साधारण पाऊस पडेल. शेतीचे पीकही साधारण राहील. देशात नैसर्गिक आपत्ती ओढावेल, देशाचा राजा कायम राहील, अशी भविष्यवाणी यावेळी वर्तविण्यात आलीय. देशाची आर्थिक स्थिती याही पेक्षा कमकुवत होण्याचा अंदाजही या भविष्यवाणीत वर्तवण्यात आला आहे.

जून महिन्यात पाऊस साधारण पडेल. जुलै महिन्यातील पर्जन्यमान चांगले असेल. तर ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण कमी असेल. सप्टेंबर महिन्यातही पाऊस कमी राहणार आहे.

भेंडवळच्या घटमांडणीत कोणकोणती भाकितं ?

पाऊस –जून महिन्यात पाऊस कमी असेल. जुलै महिन्यात चांगला पाऊस होईल, ऑगस्टमध्ये कमी अधिक पाऊस होईल, सप्टेंबर महिन्यात कमी पाऊस होईल.

अवकाळी पावसाचा प्रभाव या वेळेस कमी असणार आहे मात्र जनतेला सामोरे जावे लागणार आहे. यावर्षी चारही महिन्यात पावसाळा साधारण असून पीक परिस्थिती साधारण असले.

पीक – ज्वारी, तूर, गहू, कपाशी, सोयाबीन सर्व पीकं सर्वसाधारण येतील. पिकांची नासाडी होण्याची शक्यता आहे. पहिल्याच महिन्यात पीक पेरणी केली जाईल, चारा टंचाई भासेल.

नैसर्गिक आपत्ती – पृथ्वीवर नैसर्गिक आणि कृत्रीम आपत्तीसुद्धा येऊ शकते, रोगराईचे संकट येईल, त्यामुळे देशातील आर्थिक स्थिती सुद्धा कमकुवत होईल.

देशाचा राजा कायम – देशाचा राजा कायम असेल. मात्र आर्थिक स्थिती खालावू शकते आणि जगावर आर्थिक संकट येईल. राजावरील ताण वाढेल, शिवाय संरक्षण खात्यावरही ताण येईल. परकीयांची घुसखोरी वाढेल.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या