Ticker

6/Breaking/ticker-posts

खाजगी पशुवैद्यकांचे प्राधान्याने लसीकरण करा - डॉ . मल्हारी लवांडे

 सभापती डॉ.क्षितीज घुले यांचेकडे केली मागणी

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )


 शेवगाव :-  ग्रामीण भागात खेडोपाडी, वाडीवस्तीवर जाऊन शेतकऱ्यांकडील पशुधनाची अखंड सेवा बजावणाऱ्या शेवगाव तालुक्यातील खाजगी पशुवैद्यकीय व्यावसायिकांना फ्रन्टलाइन वर्करचा दर्जा देऊन त्यांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे,अशी मागणी  शेवगाव तालुका खाजगी पशुसेवक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.मल्‍हारी लवांडे यांनी शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितीज घुले यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

         या निवेदनात पुढे म्हटले आहे की, शेवगाव तालुक्यातील सुमारे ७५ खाजगी पदविकाधारक 

पशुवैद्यक शेतकऱ्यांकडील पशुधनासाठी अविरत लघु पशुवैद्यकीय सेवा देत आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हे काम अत्यंत जोखमीचे असल्याने त्यांना फ्रन्टलाइन वर्करचा दर्जा देऊन त्यांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे. निवेदनावर अध्यक्ष डॉ.लवांडे यांचेसह उपाध्यक्ष डॉ.विठ्ठल झिरपे, कार्याध्यक्ष डॉ.प्रदीप पाटेकर, सचिव डॉ.अंकुश दराडे आदींच्या सह्या आहेत.निवेदनाची प्रत गटविकास अधिकारी महेश डोके व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी यांना देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या