आय ए एस डॉ भापकर व पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर यांचे हस्ते प्रदान
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर: शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य आयोजित 15 वे साहित्य संमेलन 2023 चे वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय शब्दगंध समाजकार्य गौरव पुरस्कार श्रीनिवास बोज्जा यांना सहपत्नीक संमेलनाचे संमेलनाध्यक्ष आय ए एस मा. डॉ. पुरषोत्तम भापकर व नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक मा. डॉ. बी जी. शेखर यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.
या वेळी संमेलनाचे स्वागतध्यक्ष आ. संग्राम जगताप, माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, अहमदनगर महानगरपालिकेचे उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे आदी उपस्थित होते.
सदर पुरस्कारसंमेलन दोन दिवस कविवर्य ना. धो. महानोर साहित्य नगरी, पं. गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय, माळीवाडा, अहमदनगर येथे संपन्न झाला. या वेळी समाजाच्या विविध घटकात उल्लेखनिय कार्य करणार्या राज्यभरातील व्यक्तींचा सन्मान सदर शब्दगंध परिषदेचे वतीने करण्यात आला. सदर पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी त्यांची पत्नी मा. नगरसेविका सौ. वीणा बोज्जा यांच्यासह सहपत्नीक स्वीकारला.
या वेळी श्रीनिवास बोज्जा यांनी अहमदनगर शहरासह जिल्ह्यात सामाजिक कार्याबरोबरच शैक्षणिक कार्यात तसेच इतर क्षेत्रात अग्रेसर काम केले बाबत माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली.
0 टिप्पण्या