Ticker

6/Breaking/ticker-posts

LIC केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय ; 'एलआयसी' कर्मचाऱ्यांना मिळणार खूशखबर

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना येत्या आठवडाभरात केंद्र सरकारकडून खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. एलआयसी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या प्रस्तावाला अर्थ मंत्रालयाने तत्वतः मंजुरी दिली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची यंदा पगारवाढ निश्चित मानली जात आहे.

एलआयसीच्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या २० टक्के वेतन वाढीची शिफारस अर्थ मंत्रालयाला केली आहे. त्यावर मंत्रालयाने प्राथमिक मंजुरी दिलीअसल्याचे एका वृत्त संस्थेने म्हटलं आहे. येत्या आठवड्यात केंद्र सरकारकडून या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे.

नुकताच एलआयसीच्या अध्यक्षांची युनियनच्या प्रतिनिधींशी ऑनलाईन चर्चा झाली. यात व्यवस्थापनाने दिलेल्या वेतन वाढीच्या प्रस्तवाची माहिती दिली. गेल्या वेळी १७ टक्के वेतन वाढीचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्याशिवाय गृहकर्जावर १ टक्का कपातीचा प्रस्ताव देण्यात आला होता. यंदा कर्मचाऱ्यांना १८.५ टक्के ते २० टक्क्यांच्या दरम्यान पगारवाढ मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

एलआयसीच्या कर्मचाऱ्यांचा १ ऑगस्ट २०१७ पासून वेतनवाढ झालेली नाही. वेतनाचा फेरआढावा घेण्यास पहिल्यादाच इतका विलंब झाला असल्याचे कामगार नेत्यांचे म्हणणे आहे.

अर्थसंकल्पात केंद्र सरकारने एलआयसीतील हिस्सा विक्री करण्याची घोषणा केली होती. या हिस्सा विक्रीतून किमान एक लाख कोटींचा निधी उभारण्याचे सरकारचे उद्दिष्ट्य आहे. आयपीओतील १० टक्के हिस्सा एलआयसीच्या पॉलिसीधारकांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या