Ticker

6/Breaking/ticker-posts

ऊसाचा ट्रॅक्टर पलटी होऊन चालक जागीच ठार .
लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

टाकळी मानुर : -टाकळी मानुर तालुका पाथर्डी येथून ऊसाने भरलेला डबल ट्रेलर ट्रॅक्टर टाकळीमानुर पाथर्डी रस्त्यावर करोडी येथे मारुती मंदिराजवळ मागील पुढील ट्रेलरवर आदळली आणि ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पलटी झालेला ट्रॅक्टर व मागील ट्रेलर पलटी झाल्याने  चालक जागीच ठार झाला

याबाबत सविस्तर वृत्त असे की टाकळीमानुर येथील भागवत टेकाळे यांचा उस भरलेला ट्रॅक्टर वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे जात असताना करोडी जवळील उताराला ट्रॅक्टर पलटी होऊन त्यात भाऊराव भास्कर काळे व 19 राहणार बंगालीपिंपळा तालुका गेवराई जिल्हा बीड हा जागीच ठार झाला ट्रॅक्टर पलटी झालेला पाहून नागरिकांनी उसाच्या मुळ्या बाजूला फेकून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चालकास बाहेर काढले व पाथर्डी येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले तेथे त्यांचा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात घेऊन त्यांच्यावर बंगालीपिंपळा तालुका गेवराई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले याबाबत पाथर्डी पोलिसांत अकस्मात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल आजिनाथ बडे करत आहे .

रोजगाराची आशा जिवावर बेतली ..

पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागातील टाकळी मानुर तांबेवाडी गाडेवाडी चुंभळी भागात उसश्रेत्र मोठया प्रमाणात असल्याने या भागात पंधरा दिवसापासुन तीन ट्रॅक्टर मजुर उसतोडणी आले होते  शरयूअॅग्रो फलटण या साखर कारखान्याचा गळीत हंगाम संपत्यानंतर या भागातील काही ट्रॅक्टर चालकांनी उसतोडणी होईल् व ट्रॅक्टर मजुराला रोजगार एक महिना मिळेल या आशेवर आले होते . त्यात ही दुर्देवी घटना घडल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या