Ticker

6/Breaking/ticker-posts

वनविभागाचे दुर्लक्ष मात्र पर्यावरण प्रेमिंचं आहे वन्यजीवांकडे लक्ष ..!

 पर्यावरण प्रेमी नी वन्यजीव पाणवठ्याची दुरुस्ती करून पाणवठयात  टाकले पाणी

   


उन्हाळ्याला सुरूवात झाल्याने पाणवठयाची दुरूस्ती करताना वनजिव प्रेमी  (छाया -कृष्णनाथ अंदुरे )


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 खरवंडी कासार :   उन्हाळ्याची सुरूवात झाली असुन पाण्यासाठी भटकंती सुरु झाली आहे अशातच कोरोना साथीच्या आजाराने मनुष्य जात हैराण झाली आहे माणसा साठी लॉकडॉऊन चालु झाले परंतु अन्न पाणी निवारा या सोयी उपलब्ध आहेत परंतु वनजिवाचे हाल होऊ नये म्हणुन दरवर्षी प्रमाणे या वर्षी पानवठयाची दुरूस्ती करून त्यामध्ये वनप्रेमीनी पाणी भरले 

       अशा समाज्यामधील पर्यावरण प्रेमीचा निश्चित अभिमान वाटतो  मात्र खंत आहे ति वनविभागा बदलची टाळु वरचे लोणी खाल्या प्रमाणे 

पाणवठे वनजिव प्रेमीनी लोकवर्गनी करत  बाधांयचे पाणीही  टाकायचे पण कसलेही काम न करता बिल मात्र वनविभागाने  काढायचे  हे प्रकार सरासर पणे चालु आहेत  वनविभागाने पाथर्डी तालुक्यात किती  पाणवठे बाधंले व त्यामध्ये किती वेळा पाणी टाकले यांची चौकशी करण्याची मागणी पर्यावरण प्रेमी कडुन होत आहे 

      भगवानगड रस्त्यावर वनविभागाच्या हदीमध्ये दोन  वर्षांपुर्वी समाजशील बांधव व शाळेतील विद्यार्थ्यांच्या मदतीतून वन्यप्राणी व पशू पक्षांची तहान भागविण्यासाठी भगवानगड डोंगर परिसरात संत भगवानबाबा वन्यजीव पाणवठा बांधण्यात आला. आपली तहान भागविण्यासाठी पाणवठ्यावर आलेल्या अनेक वन्यप्राण्यांचे दर्शन येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना सतत होते. काही समाजकंटकांनी मात्र विनाकारण पाणवठा फोडून आपल्यातील विकृतीचे दर्शन घडवले. समाजात असा विकृत मानसिकतेचा वर्ग सतत कार्यरत असतो. ज्यांना चांगले काही पहावत नाही व पटतही नाही. समाजातील हा विकृत मानसिकतेचा वर्ग समाजासाठी खूप घातक असतो. 

      उन्हाची तिव्रता प्रचंड वाढल्यामुळे सहाजिकच पाण्यासाठी वन्यप्राण्यांची भटकंती सुरू झाली आहे. ही गोष्ट लक्षात येताच खरवंडीतील तरुण  हळहळले त्यांनी पाणवठा दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला.  भारजवाडी शाळेचे शिक्षक लहु बोराटे नितीन खेडकर  पांडूरंग खेडकर, दादा अंदुरे, अमोल ढाकणे, गणेश कांबळे , रवि गोल्हार  ही पर्यावरण प्रेमी मंडळीही होती. या तरुण मित्रांनी पाणवठ्याची दुरुस्ती केली. पाणवठ्यात टाकलेले  दगडगोटे, माती व कचरा याची साफसफाई करून आपल्यातील माणुसकीचे अप्रतिम दर्शन घडवले आहे.

हेच तरूण लोक वर्गणी मधुन गेल्या तिन चार वर्षापासुन या पाणवठया मध्ये पाणी भरतात मात्र वन विभाग मात्र कागदी घोडे नाचवत  बिल काढत असल्याने  पाथर्डी वनविभागाची चौकशी करावी व यापुढे या पानवठ्या मध्ये वनविभागामार्फत पाणी भरावे अशी मागणी वन्य प्रेमी कडुन होत आहे 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या