Ticker

6/Breaking/ticker-posts

"त्या" मुन्नाभाई डाॅक्टरला आश्रय देणारे पोलिसांच्या रडारवर !

 



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

शिरूर : तालुक्यातील कारेगाव येथील मोरया मल्टी स्पेशालिटी नावाने बोगस हॉस्पिटल चालविणाऱ्या मुन्नाभाईला पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर आता हे हॉस्पिटल कोणाच्या आश्रयाने चालत होते त्याचा पोलिस शोध घेत आहेत.

कोव्हिडचे 22 रुग्ण दाखल असलेल्या बोगस हॉस्पिटल आणि डॉक्टरचा पर्दाफाश झाल्यानंतर काल संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. येथील कोरोनाचे सर्व रूग्ण  इतरत्र हलविण्यात आले असून हे हॉस्पिटल आता सील  करण्यात आली आहे. कारेगाव पोलीस ठाण्यापासून  अवघ्या हाकेच्या अंतरावर हे हॉस्पिटल चालू होते.

कारेगाव एमआयडीसी सारख्या गजबजलेल्या भागात बोगस हॉस्पिटल चालवण्याचे धाडस या डॉक्टरने कसे केले त्याला कोणी सहकार्य करीत होते का याबाबत पोलिस तपास चालू आहे

.रांजणगाव, कारेगाव या भागात मोठ्या प्रमाणात दवाखाने आहेत या सर्व डॉक्टरांची मिळून 'रांजणगाव गणपती, कारेगाव डॉक्टर्स असोसिएशन' नावाने संघटना आहे. मात्र या संघटनेला ही या बोगस हॉस्पिटलचा थांगपत्ता लागू नये या बाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आज या हॉस्पिटलच्या परिसरात 'पारनेर दर्शन'च्या प्रतिनिधीने भेट दिली असता या परिसरात संपूर्ण शुकशुकाट दिसून आला. या हाॅस्पीटलची एक जुनी रूग्णवाहीका मात्र, हाॅस्पीटलसमोर उभी होती. या ठिकाणचे औषधाचे दुकान ही बंदच होते. मात्र रुग्णांचे ॲडव्हान्स म्हणून घेतलेले आपले पैसे परत मिळतील या आशेने याठिकाणी दाखल असलेल्या काही रुग्णांचे नातेवाईक आज सकाळी रुग्णालय परिसरात येऊन गेल्याचे सांगण्यात आले. अधिक तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या