Ticker

6/Breaking/ticker-posts

कोरोनाचे नियम पाळत शेवगाव शहरात महामानवाला अभिवादन

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

शेवगाव :-  भारती राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती कोरोनाचे नियम पाळत शेवगाव शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

    आंबेडकर चौकात विविध पक्ष संघटना व सामाजिक संघटनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच क्रांती चौक येथे सम्राट अशोक मंडळाच्या वतीने एलईडी स्क्रिनवर डॉ. आंबेडकर यांचा जीवनपट साकारून त्यांच्या पुतळ्याचे विविध मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले. 

     यावेळी जेष्ठ नेते पवनकुमार साळवे, भाजपाचे सुनिल रासने, आ.रपीआयचे शहराध्यक्ष सुनिल आहुजा, मनसेचे तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे, सम्राट अशोक नगरचे अध्यक्ष राहुल सावंत,अरूण मगर, शेखर तिजोरे, राहूल पवार, राहूल पगारे,प्रशांत मगर, विकी मगर, संदिप पंडित,भाऊसाहेब लिंगे, गणेश डोमकावळे, देविदास हुशार, विठ्ठल दुधाळ, यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या