Ticker

6/Breaking/ticker-posts

मस्तच ! नवे फीचर आले, आता होणार तुमचे आधार कार्ड, तुमच्या चेहऱ्याने डाउनलोड..

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्ली : आधार कार्डचा अनेक ठिकाणी वापर केला जातो. खासगी काम असो की सरकारी आधार कार्ड आता बंधनकारक झाले आहे. आधार कार्ड तुम्हाला अपडेटेड डिटेल्स सोबत हवे असेल तर UIDAI चे एक नवीन फीचर आले आहे. हे आधार कार्ड वापर करण्यास युजर्संना खूप फायदेशीर ठरणार आहे.

या नवीन आधार कार्डचे फीचरने नाव फेस ऑथेंटिकेशन आहे. म्हणजेच आता आधार कार्ड होल्डर व्यक्ती ऑनलाइनवरून आपल्या चेहऱ्याच्या मदतीने आपले आधार कार्ड डाउनलोड करू शकाल. यासाठी UIDAI च्या वेबसाइटवर जावे लागेल. फेस ऑथेंटिकेशन फीचर विना ओटीपी कार करते. या फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला आधार सेंटरवर जाण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसून आपल्या लॅपटॉपवरून करू शकता.

असा या फीचरचा वापर करा

१. सर्वात आधी तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर जावे लागेल.

२. यानंतर तुम्हाला होमपेजवर जावे लागेल. तुम्हाला गेट आधार कार्ड (Get Aadhaar Card) चे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.

३. यावर क्लिक केल्यानंतर फेस ऑथेंटिकेशनचे ऑप्शन दिसेल.

४. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि कॅप्चा टाकावे लागेल.

५. प्रोसेस पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आपला चेहरा व्हेरिफाय करावे लागेल.

६. यानंतर तुमच्या लॅपटॉप किंवा कम्प्यूटरचा कॅमेरा ओपन होईल तुमचा चेहरा स्कॅन होईल. पूर्णपणे स्कॅन झाल्यानंतर तुमचा हा फोटो घेतला जाईल. यासाठी तुम्हाला चेहरा बरोबर कॅमेऱ्याकडे सरळ ठेवायचा आहे.

७. ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमचे आधार कार्ड डाउनलोड करू शकता.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या