Ticker

6/Breaking/ticker-posts

पोस्टात खाते उघडणाऱ्यांसाठी मोठी बातमी; नियम बदलले ! थेट ग्राहकांवर परिणाम

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्लीः जर आपण ) खाते उघडले असेल तर आपल्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. कारण बचत खात्याशी संबंधित नियम बदलले गेलेत. इंग्रजी वृत्तपत्र इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, काही लोकांना टपाल कार्यालयात शून्य शिल्लक बचत खाते उघडता यावे, यासाठी सरकारने आपले नियम बदललेत. सध्या पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यात किमान शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. आपण असे न केल्यास शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे.

लोक सुरक्षित पर्याय म्हणून पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये गुंतवणूक करतात. त्यात गुंतवलेली संपूर्ण रक्कम 100 टक्के सुरक्षित असल्याची हमी आहे. त्याच्या ठेवींवरील सार्वभौम हमी, म्हणजेच जर पोस्ट ऑफिस खातेदारांचे पैसे परत करण्यात अयशस्वी ठरली, तर सरकार गुंतवणूकदारांच्या पैशाची हमी देते.

नवीन नियम काय सांगतो?

वित्त मंत्रालयाने 9 एप्रिल 2021 रोजी टपाल कार्यालयातील बचत बँक खात्यासंदर्भात अधिसूचना जारी केलीय. यात पोस्टात कोण शून्य बॅलन्समध्ये सेव्हिंग खाते उघडू शकेल, याबद्दलही सांगण्यात आलेय.
कोणत्याही व्यक्तीचा अर्थ असा आहे की, कोणताही सामान्य माणूस यात खाते उघडू शकतो. कोणत्याही शासकीय कल्याणकारी योजनेचा नोंदणीकृत प्रौढ सदस्य आहे आणि ज्याच्या नावे कोणत्याही शासकीय फायद्यासाठी एखाद्या अल्पवयीन मुलाच्या पालकांनी नोंदणी केलीय.

तर आपण पोस्ट ऑफिसमध्ये असे शून्य शिल्लक खाते उघडू शकता

या लोकांनी उघडलेल्या मूलभूत बचत खात्यात शून्य शिल्लक असेल. परंतु एकापेक्षा जास्त ठिकाणी ते उघडले जाऊ शकत नाही. शासकीय कल्याणी योजना आणि इतर कोणत्याही योजनांकडील पैसेही या खात्यात जमा करता येतील.
जर आपण कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असाल, जसे की पेन्शन, शिष्यवृत्ती, एलपीजी अनुदान इत्यादी आणि आपल्याला बचत खात्यात किमान शिल्लक ठेवायची नसेल तर आपण पोस्ट ऑफिसमध्ये असे शून्य शिल्लक खाते उघडू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या