Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्हाभर पडणा-या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची उडतेय धांदल

 








लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अ.नगर:- नगर  शहर व तालुक्यासह जिल्हाभर सुरु असलेल्या अवकाळी पाऊस शेतकर्यांसाठी चांगलाच डोकोदुखी ठरला आहे. बहुतांशी भागामध्ये सध्या कांदा काढणीची कामे सुरू आहेत . मात्र वादळी वाऱ्यांसह रोजच पडणाऱ्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे . काढणी केलेल्या कांदयाला अवकाळी पावसाचा तडाखा बसत असून पिकांचे मोठे नुकसान होत आहे . पावसाचा अंदाज दिसल्यास कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडताना दिसत आहे .

मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसाने भूगर्भातील पाणी पातळी वाढली . यंदा पाणीटंचाई निर्माण होणार नसल्याचा अंदाज बांधत नगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केलेली आहे . मात्र या वर्षी वातावरणात होणारे बदल अन् रोगराई थांबण्याचे नावच घेत नसल्याचे दिसते . कांदा लागवडीपासूनच या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे . कांदा काढणीला आला तरी वातावरण शेतकऱ्यांना साथ देत नाही . त्यातच वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने रंग दाखवायला सुरुवात केल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे . तालुक्यात सर्वच भागात कांदा काढणीचे काम सुरू आहे . काढलेला कांदा गोळा करून शेतातच ठेवलेला आहे . वादळी वारे व अवकाळी पावसाचा अंदाज दिसला की कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ होताना दिसत आहे .

 कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे . लागवड झालेल्या कांदा रोपाला सततच्या पावसाने फटका बसल्याने शेतकऱ्यांना दुबार कांदा लागवड करावी लागली . महागडे कांदा बियाणे , मजुरी , खते आणि फवारणीसाठी महागडी औषधे या शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागला आहे . कांदा विक्रीतून मोठे उत्पादन मिळेल अशी आशा निर्माण झाली असतानाच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरविले आहे . अवकाळी पावसामुळे काढणी केलेला कांदा शेतातच भिजत असल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसणार आहे .

वादळी वाऱ्यासह होणाऱ्या अवकाळी पावसाने चारा पिकांचे नुकसान होत आहे . वादळी वाऱ्याने कडवळ , मका भुईसपाट होत आहे . तालुक्यात बहुतांशी भागात गव्हाचे खळे झाले आहे . गव्हाचा भुसा ( गौंडा ) शेतातच पडलेला आहे .जनावरांच्या चाऱ्यासाठी गौंड्याचा वापर केला जातो . पावसाने गौंडा भिजू नाही म्हणून गोळा करण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ होत आहे


कांदा लागवडीसाठी महागडे बी टाकून रोपे तयार केली . पण सततच्या पावसाने कांदा रोपे जागेवर सडली . त्यामुळे महागडी रोपे व बियाणे घेऊन कांदा लागवड केली . सुरुवातीपासून वातावरणात बदल होताना पिकांवर काढणीपर्यंत महागडी औषधे फवारणी करावी लागली . सध्या काढणी केलेल्या कांद्याला अवकाळीन पावसाने तडाखा दिला आहे . शेतकऱ्यांवर निसर्ग संकटाची मालिका आताही चालूच आहे . त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. ऐन भरात असलेल्या आम्बा पिकाचेही मोठे नुकसान होत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या