लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
भिंड: मध्य प्रदेशातील भिंडमधील शहराच्या मध्यवर्ती
भागात असलेल्या कॉम्प्लेक्सवर पोलिसांनी छापा मारला. दुकानाचे शटर उघडल्यानंतर
आतमध्ये तरूण-तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले. पोलिसांना पाहून काही जण पळून
गेले. पोलिसांनी तीन तरूण आणि दोन तरुणींना पकडले. छापे टाकणाऱ्या पोलिसांशी
इमारतीच्या मालकाने गैरवर्तन केले. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले.
भिंड पोलिसांना खबऱ्यांकडून याबाबत माहिती
मिळाली होती. नेहरू कॉम्प्लेक्समध्ये अवैध धंदे सुरू असल्याचे समजताच, गुरुवारी संध्याकाळी डीएसपी पूनम थापा
यांच्यासह पथकाने कॉम्प्लेक्सवर छापा मारला. दुकानाचे शटर उघडले असता, त्यात तरूण-तरूणी आक्षेपार्ह अवस्थेत आढळले. पोलिसांना बघून घटनास्थळावरून
तरूण-तरुणींनी पळ काढला. पण पोलिसांनी तीन तरूण आणि दोन तरूणींना पकडले.
कारवाई सुरू असताना, इमारतीचा मालक अभिषेक याने पोलिसांशी गैरवर्तन केले.
अभिषेक याने एका पोलीस कर्मचाऱ्याच्या ठोसा मारला. त्यानंतर पोलिसांनी त्यालाही
ताब्यात घेतले. त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सर्वांची चौकशी सुरू असून,
पुढील कारवाई करण्यात येत आहे, असे
पोलिसांकडून सांगण्यात आले. शहरात कारवाई सुरूच राहील. इमारतीचा मालक एका तासासाठी
तरूण-तरुणींकडून दीडशे रुपये घेत होता. शहराच्या विविध भागांतही कारवाई सुरूच राहील, असेही पोलिसांनी सांगितले.
0 टिप्पण्या