लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नगर :- जेष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी यांच्या शुभहस्ते सत्कार स्विकारतांना जय हिंद सैनिक सेवा फौंडेशनचे शिवाजी पालवे व शिवाजी गर्जे सन्मानाचे आयोजक त्रिद्ल सैनिक बहुउद्देशीय संघटना गुंडेगाव, ता. नगर चे सतीश हराळ, शामराव कासार,भास्कर चुंबळकर, विठ्ठल माने, मुरलीधर भापकर,बबन हराळ, राहुल चौधरी, संभाजी भापकर, अशोक भापकर, संतोष जाधव, झुंबर भापकर, बाळासाहेब भापकर उपस्थित होते लवकरच त्रिद्ल सैनिक बहुउद्देशीय संघटना गुंडेगाव, चे उद्घाटन होणार असुन गुंडेगावा 130च्या आसपास आजी माजी सैनिक असल्याने या संघटनेच्या माध्यमातुन अनेक सामाजिक शैक्षणिक पर्यावरण संतुलन शहिद परिवार सैनिक परिवार गोरगरिबा साठी व जनहिताचे उपक्रम राबवले जाणार आहेत जय हिंद फौंडेशन वेळो वेळी मार्गदर्शन करून मदत करणाऱ आहे
आदर्श समाजसेवक भापकर गुरुजी
राजाराम भापकर हे अहमदनगरमध्ये भापकर गुरुजी नावानेच ओळखले जातात, पण त्यांची खरी ओळख आहे ‘महाराष्ट्राचा मांझी’ म्हणून. प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना, आपल्या गावातील रस्त्याची अडचण त्यांनी ओळखली. राज्य सरकारकडे मागणी करूनही रस्ता मंजूर झाला नाही. त्यामुळे नगर तालुक्यात गुंडेगाव परिसरात त्यांनी स्वखर्चाने डोंगरमाथ्यावर २६ किलोमीटरचे रस्ते तयार केले. त्यांनी गेल्या ५७ वर्षांत सुमारे ४0 किलोमीटरचे रस्ते स्वत:च्या खर्चाने बांधले आहेत. त्यासाठी तब्बल ७ डोंगरांतून खणून वाट तयार करावी लागली. कोळेगावच्या शाळेत ते शिकवत, तेव्हा विद्यार्थ्यांना डोंगर पार करून शाळेत यावे लागे. त्यामुळे विद्यार्थीही शाळेत यायला टाळाटाळ करीत. कोळेगाव ते देऊळगाव हे अंतर तेव्हा २९ किलोमीटर होते, पण भापकर गुरुजींनी रस्ते बांधल्यामुळे ते आता १0 किलोमीटर झाले आहे.
स्वत:च्या नोकरीतील पेन्शन विक्री, ग्रॅच्युएटी, भविष्य निर्वाह निधी अशी यातील निम्मी रक्कम त्यांनी केवळ या रस्त्याच्या बांधणीसाठी खर्च केली. सरकारकडून एकही पै घेतली नाही. त्यांनी तयार केलेल्या या रस्त्यावर गत १ डिसेंबरला ‘गुंडेगाव-पुणे’ ही पहिली एस.टी. बस धावली. भापकर हे आज ८५ वर्षांचे आहेत. मात्र, या वयातही ते सामाजिक कामांसाठी पाठपुरावा करत आहेत. पायजमा, सदरा आणि गांधी टोपी अशा वेशातील भापकर गुरुजी आजही सक्रिय आहेत. बिहारमधील दशरथ मांझी या मजुराने २२ वर्षांत ११0 किलोमीटरचे रस्ते स्वखर्चाने बांधले. त्यामुळे त्याच्या गावापासून गया हे अंतर ५५ किलोमीटरवरून १५ किलोमीटरवर आले. भापकर गुरुजींनी काम सुरू केले, तेव्हा त्यांना कदाचित दशरथ मांझी हे नाव माहीतही नसेल, पण तेही आता महाराष्ट्राचे मांझी ठरले आहेत. संपूर्ण भारतात भापकर गुरुजींच्या कामाची दखल घेतली गेली, परदेशी नियतकालिकांनीही त्यांच्या कामाचा गौरव केला, पण महाराष्ट्राला मात्र, आजतागायत त्यांच्या कार्याची ओळख झालेली नाही. समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम शिक्षक असतो, याची प्रचिती देणारी प्रेरणादायी कहाणी भापकर गुरुजींनी आपल्या घामाच्या शाईने लिहून ठेवली आहे.असेही यावेळी पालवे यानी सांगितले.
0 टिप्पण्या