Ticker

6/Breaking/ticker-posts

गुड न्यूज ! रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात थांबवली, केंद्राचा निर्णय

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्लीः महाराष्ट्र, गुजरातसह अनेक राज्यांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्र सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय आहे. केंद्र सरकारने रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. एएनआयने हे वृत्त दिलं आहे.

देशात गेल्या महिन्याभरापासून करोनांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. अशातच गेल्या काही दिवासंपासून रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा देशात जाणवत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. देशात करोनाने निर्माण झालेली स्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत ही निर्यात बंद राहील, असा आदेश सरकारने सर्व संबंधित औषध कंपन्यांना दिला आहे.

एवढचं नव्हे तर रेमडेसिवीरचे उत्पादन करणाऱ्या सर्व कंपन्यांना आपल्याकडी साठ्याची माहिती आणि उत्पादन निर्मीतीची माहिती आपल्या वेबसाइटवर द्यावी लागणार आहे. रेमडेसिवीरचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना आपल्या पुरवठार आणि डिस्ट्रीब्युटर्सकडी साठ्याची माहितीही द्यावी लागणार आहे. तसंच औषधांचा काळा बाजार रोखण्यासाठी औषध निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी वेळोवेळी जाऊन औषधाचा साठ्याबाबात कंपन्यांनी दिलेल्या माहितीची पडताळणी करायची आहे, असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.

देशातील करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे रेमडेसिवीरचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी त्याचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकार देशातील औषध निर्मती कंपन्यांच्या संपर्कात आहे, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवासांपासून करोनावरील उपचारात उपयोगी असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन विकत घेण्यासाठी मेडकल दुकानांबाहेर रुग्णांच्या नातेवाईकांच्या लांबच लांब रागां आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी त्यांना १२-१२ तास रांगेत उभं रहावं लागत आहे. तरीही अनेकदा इंजेक्शन मिळत नाहीए. फक्त महाराष्ट्रातच नाही तर गुजरातमध्येही काही भागांमध्ये अशीच स्थिती आहे. इंजेक्शनसाठी काही ठिकाणी नागरिकांनी नागरिकांनी आंदोलनही केलं आहे.


देशात गेल्या २४ तासांत १.५२ हजार नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही ८ लाखांच्यावर गेली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारची चिंता वाढली आहे. अशातच रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा होत असल्याने नागरिकांमध्ये रोष वाढत होता.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या