Ticker

6/Breaking/ticker-posts

मुंबईत खासगी वाहनांसाठी आता कलर कोड सक्ती; 'हे' स्टिकर गाडीवर नसल्यास...

 


लोकनेता न्यूज                  

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई:-मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनी आज एक व्हिडिओ संदेश जारी करत कलर कोड सक्तीची घोषणा केली. संचारबंदी काळातही मुंबईतील रस्त्यांवर वाहनांचा मुक्तसंचार सुरू असल्याने तसेच वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असल्याने मुंबई पोलिसांनी हा कठोर निर्णय घेतला आहे. याबाबत नगराळे यांनी माहिती दिली. कलम १४४ नुसार मुंबई शहरात फक्त विशिष्ट कलर कोड असलेल्या गाड्यांनाच परवानगी दिली जाणार आहे. अत्यावश्यक सेवेसाठी तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी वापरात असलेल्या खासगी वाहनांसाठी हे तीन कलरचे कोड बंधनकारक करण्यात आले आहेत. त्यात अत्यावश्यक सेवेतील वाहनांवर पिवळा कलर कोड असणार आहे. मेडिकल सेवा पुरवणाऱ्या वाहनांवर लाल कलरचा कोड असणार आहे आणि भाजीपाल्याच्या वाहनांवर हिरवा कलर कोड असणार आहे. कलर कोडचा दुरूपयोग केल्यास कलम ४१९ व इतर कलमांतर्गत कारवाई केली जाणार, असे हेमंत नगराळे यांनी सांगितले.

कलर कोड पद्धतीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी शहराचे प्रमुख एंट्री पॉइंट तसेच अन्य महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. या नाकाबंदीत स्टिकरशिवाय असणाऱ्या गाड्या अडवून तपासणी केली जाणार आहे. कलर कोड नसेल मात्र वाहन अत्यावश्यक सेवेसाठी चालवले जात असेल तर कागदपत्र तसेच इतर शहानिशा करून त्या वाहनाला कोड दिला जाईल, असेही सांगण्यात आले. विनाकारण फिरणाऱ्यांना वेसण घालण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा, आरोग्य सेवा तसेच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांना स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये कोडचे स्टिकर दिले जाणार आहेत. हे स्टिकर संबंधितांनी पोलीस स्टेशनमधून घ्यावे, असेही सांगण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लगेचच सुरू करण्यात आली असून काही ठिकाणी थेट रस्त्यावरच अशी वाहने थांबवून त्यांना स्टिकर लावण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या