Ticker

6/Breaking/ticker-posts

रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडांवरील वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्यांचा अर्थ नेमका काय? वाचा..

 


लोकनेता न्यूज                  

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई : आपण बऱ्याचदा कुठेही  फिरताना रस्त्याच्या कडेला आपल्याला माहिती देणारे रंगेबिरंगी दगड ठिकठिकाणी बघायला मिळतात. रस्त्याच्या अगदी कडेला विशिष्ट आकारच्या दगडावर कोणतं गाव किती किलोमीटरवर आहे, याची माहिती दिलेली असते. मात्र, या दगडांवर माहितीसोबत वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्याही आपल्याला बघायला मिळतात. या रंगेबिरेंगी पट्ट्यांचा नेमका अर्थ काय असेल? याचबाबत माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आ

नारंगी रंगाची पट्टी

अनेकदा आपण सस्त्याच्या कडेला असलेल्या माहिती देणाऱ्या फलकावर (दगडावर) नारंगी रंगाची पट्टी बघतो. या पट्टीचा अर्थ म्हणजे तुम्ही ग्रामीण भागातील रस्त्यांवरुन चालत आहात. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, जवाहर रोजगार योजना आणि इतर योजनांअंतर्गत गावात तयार करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कडेला असलेल्या माहितीसूचक दगडावर नारंगी रंगाची पट्टी लावण्यात आलेली असते. भारतात ग्रामीण रस्त्यांचं जाळ हे जवळपास 3.93 लाख किमी इतकं आहे.

पिवळी पट्टी

पिवळ्या पट्टीचा अर्थ असा की तुम्ही राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करत आहात. एका शहातून दूसऱ्या शहरात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी तुम्ही राष्ट्रीय महार्गावरुन प्रवास करत असाल तर तुम्हाला रस्त्याच्या कडेला असलेल्या माहितीसूचकावर पिवळ्या रंगाची पट्टी दिसेल. भारतात राष्ट्रीय राजमार्गाचं जाळ जवळपास 1 लाख 51 हजार 19 किमी इतकं आहे.

निळ्या, काळ्या किंवा पाढऱ्या रंगाची पट्टी

तुम्ही जर रस्त्याच्या कडेला असलेल्या दिशासूचकावर निळ्या, काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची पट्टी बघितली तर शहरी किंवा जिल्हांतर्गत रस्त्यावर आहात. भारतात या रस्त्याचे जाळे 5 लाख 61 हजार 940 किमी हजार इतकं आहे.

हिरवी पट्टी

राज्यांतर्गत शहराशहराला जोडणाऱ्या रस्त्याच्या कडेला माहिती देणाऱ्या माहिती सूचकावर हिरव्या रंगाची पट्टी असते. 2016 च्या आकडेवारीनुसार देशात या रस्त्यांचे जाळे हे 1 लाख 76 हजार 166 किमी इतके आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या