Ticker

6/Breaking/ticker-posts

सोनदेव ठरले एका दिवसात जालना जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण करणारे गाव !

 सरपंच गजानन ढाकणे यांच्या पुढाकारातून २५८ जणांचे लसीकरण




लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

सोनदेव : -युवा सरपंच गजानन ढाकणे यांच्या विशेष प्रयत्नातून जालना तालुक्यातील सोनदेव येथे शनिवारी ता.१० एका दिवसात तब्बल २५८ नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात एका दिवसात सर्वाधिक लसीकरण करणारे गाव म्हणून सोनदेव हे गाव पुढे आले आहे. 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लसीकरनाला वेग आला आहे. आता आरोग्य केंद्रस्तरावर लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. ही लस पूर्ण सुरक्षित असून सर्व पात्र नागरिकांनी लसीकरण करावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश कुलकर्णी यांनी यावेळी केले. या लसीकरण मोहिमेचे उदघाटन सरपंच गजानन ढाकणे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या या मोहिमेअंतर्गत 258 नागरिकानी लस टोचून घेतली. 



आतापर्यंत जिल्हात सर्वात जास्त लसीकरण करण्यामध्ये जिल्हात प्रथम क्रमांक सोनदेव या गावाने मिळवला आहे. यावेळी  ग्रा.प.सदस्य समाधान ढाकणे, अनिल माघाडे, अनंता ढाकणे व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच डॉ. दिनेश कुलकर्णी, डॉ. मंगेश बारवकर, आरोग्य साहाय्यक जोशब सिस्टर आरोग्य सेविका गुंजाळ सिस्टर आरोग्य सेविका पडघन सिस्टर आरोग्य सेवक हगोने, खाडे, सवणे, तारू यांची उपस्थिती होती.

अंगणवाडी सेविका व मदतनीस व शिक्षक वृंद या सर्वांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाचे सर्व नियोजन सोनदेव धारा चे सरपंच गजानन ढाकणे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी, कारभारी आंधळे, गजानन शेजुळ, अनंता ढाकणे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या