Ticker

6/Breaking/ticker-posts

तातडीने रेमडीसिव्हर इंजक्श पुरवा : आ.राधाकृष्ण विखे पा . यांची मागणी

 


 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )


अहमदनगर : - जिल्ह़्यासह राहाता तालुक्यात रेमडीसिव्हर इंजक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असून, इजंक्शन मिळत नसल्याच्या कारणाने कोव्हीड रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी अडचण लक्षात घेवून जिल्हयासाठी तातडीने या इंजक्शनचा पुरवठा उपलब्ध करून द्यावा आशी मागणी भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

यासंदर्भात आ.विखे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाकरे यांना जिल्हायातील गंभीर परिस्थितीचे वास्तव एका पत्रातून विषद केले असून रेमडीसिवीर इंजक्शनची मागणी वाढली असताना सुध्दा उपलब्ध होत नाही. या इंजक्शनचा साठा करून ठेवला आहे का याबाबत कोणतीही स्पष्टता होवू शकत नसल्याने या इंजक्शनचा काळा बाजार होत असल्याच्या घटना समोर आल्याने रूग्णांच्या नातेवाईकांची होत असलेली वणवण आणि लूटमार थांबविण्यासाठी शासनानेच जिल्ह्यात आणि राहाता तालुक्यात रेमडीसिवीर इंजक्शनचा साठा त्वरीत उपलब्ध करुन देण्याची मागणी आ.विखे यांनी या पत्रातून केली आहे.

जिल्ह्यात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, हॉस्पीटल मध्ये बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटर सुध्दा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. हॉस्पिटल मधून आकारण्यात येत असलेली बील, रूग्णालय व्यवस्थापनाकडून देण्यात येत असलेली अमानवी वागणूक असे संतापजनक प्रकार घडत असताना सुध्दा प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याने याबातही आपण व्यक्तिगत लक्ष घालून जनतेला दिलासा देण्यासाठी संबधिताना सूचना देण्याची विंनती आ.विखे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या