Ticker

6/Breaking/ticker-posts

Samsung Galaxy M12 फोनची जबरदस्त विक्री, बनवला रेकॉर्ड..!

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्लीः सॅमसंगने नुकताच Samsung Galaxy M12 स्मार्टफोन लाँच केला आहे. ग्राहकांचा याला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. १८ मार्चला फोनचा पहिला सेल आयोजित करण्यात आला होता. पहिल्या सेलमध्ये ४८ तासांत ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अॅमेझॉनवर सर्वात जास्त विकला जाणारा स्मार्टफोन आहे. अॅमेझॉन इंडियवर प्रत्येक तासात आपला बेस्ट सेलिंग प्रोडक्टची लिस्टला अपडेट केले आहे.

फोनची किंमत ?
११ रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या सुरुवातीत येणाऱ्या या फोनला नुकतेच लाँच करण्यात आले आहे. या फोनमध्ये खास वैशिष्ट्ये म्हणजे यात 6000mAh ची बॅटरी दिली आहे. स्मार्टफोनच्या 4GB + 64GB वेरिएंटची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज फोनची किंमत १३ हजार ४९९ रुपये आहे. फोनला तीन कलर ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन या रंगात उपलब्ध केले आहे. फोनला आयसीआयसीआय बँक क्रेडिट व डेबिट कार्ड धारकांना १ हजार रुपयांची सूट दिली जात आहे.

6000mAh ची बॅटरी
स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. जो १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. कंपनीचा दावा आहे की, ४ जी नेटवर्कवर ५८ तासांचा टॉकटाईम देतो. फओनमध्ये एचडी+ (720x1,600 पिक्सल) रेजॉलूशनचा 6.5 इंचाचा इनफिनिटी-वी डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. स्मार्टफोन अँड्रॉइड 11 आधारित One UI 3.1 वर काम करतो.

48 MP  चा रियर कॅमेरा
स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर, २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये  Exynos  850 प्रोसेसर दिला आहे. फोनची स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबी पर्यंत वाढवता येऊ शकते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या