Ticker

6/Breaking/ticker-posts

जामखेड तालुक्यातील निवड झालेले सरपंच व उपसरपंच याप्रमाणे

 लोकनेता न्यूज ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

जामखेड– तालुक्यातील गावकारभाऱ्याच्या निवडणुकीत काही ग्रामपंचायत मध्ये पुन्हा आलो तर काही ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदाच्या निवडणुकीत पुन्हा गेलो असल्याचे चित्र दिसत आहे.या तालुक्यातील ४९ ग्रामपंचायत निवडणुकीत १० ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या तर उर्वरित ३९ ग्रामपंचायत सरळ लढती झाल्या आहेत.४९ ग्रामपंचायत मध्ये  ४१७ सदस्य असून त्यामध्ये एकूण ११७ सदस्य बिन विरोध झाले होते.त्यामुळे ३९ ग्रामपंचायत मध्ये सरळ लढती झाल्या आहेत.

              एका वर्षावर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आल्या असताना या ग्रामपंचायत च्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीकडे पाहिले जात आहे.त्यामुळे जवळा व खर्डा गटातील महत्वाच्या ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी व भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. त्यामुळे कही ख़ुशी कही गम म्हणण्याची वेळ दोन्ही पक्षांवर आली आहे.त्यामुळे या ग्रामपंचायत मध्ये पहिल्यांदा माजी मंत्री राम शिंदे व आमदार रोहित पवार यांच्या गटात तटाच्या लढती पहावयास मिळाल्या आहे.त्यामुळे माजी मंत्री राम शिंदे यांच्या चोंडी गावात देखील संतात्तर होऊन राष्ट्रवादीचा झेंडा चोंडीत रोवला गेला  आहे, तसेच तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली खर्डा ग्रामपंचायत मध्ये सत्तातर होऊन राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली आहे.त्यामुळे तालुक्यात या वर्षीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वरचष्मा झाला आहे तर भाजप क्रमांक दोनचा पक्ष राहिला असून काही ठिकाणी स्वभिमानी शेतकरी संघटनेचे सदस्य झाले आहेत तर मनसेचे माजी सरपंच दादासाहेब सरनोबत व राष्ट्रवादीची युती हि कुसडगाव येथे झाली आहे तेथे बापूसाहेब कार्ले सरपंच झाले आहेत. त्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायत वर आपले वर्चस्व सत्ता स्थापण्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले आहे.  

गाव-                सरपंच-             -           उपसरपंच

 

बाळगव्हाण – खाडे विजुबाई सुरचंद , -गोपळघरे राहुल अश्रुबा ,

मोहरी – येळे मंगल धोंडीबा ,- बारगजे हनुमंत माधव

राजेवाडी – कुमटकर मंगल मोहन ,- पूजा विक्रम गोरे

धोंडपारगाव – मनीषा औदुंबर शिंदे, -दत्तात्रय भीमराव शिंदे   

घोडेगाव – जगताप शरद भास्कर , -मुलाणी शमशाद शौकत

खुरदैठण – मंदाबाई विठ्ठल डूचे ,-मनीषा अविनाश ठाकरे

तरडगाव – ज्योती जयराम खोत , -सुमन बापूराव पवार

पिंपरखेड – ढवळे कांचन बापूराव , -गायकवाड अविनाश अशोक

धामणगाव – ज्योती महारुद्र महारनवर,- थोरात गणेश राजेंद्र

नान्नज – प्रभावती अभिमान मोहळकर , -साठे शालन सुभाष

 गुरेवाडी – सरपंच रिक्त ,  -कोरडे छबुराव राजाभाऊ

आघी – इंगल रावसाहेब मारकड, -सोजर नवनाथ घुले

खांडवी – भोसले धनश्री मनेष , -दिपक दिगंबर नेटके

जवळके – उषा सुभाष माने,-वंदना संतोष वाळूंजकर

आपटी – संध्या नंदकुमार गोरे, -पंडित सोनबा गोरे, 

सारोळा – रितू अजय काशीद, -मासाळ अनिता राजेंद्र

लोणी – रघुनाथ पंढरीनाथ परकड,- गव्हाळे संजय महादेव

बोर्ले – मनीषा सचिन काकडे, -जालिंदर दत्तात्रय चव्हाण

आनंदवाडी – गीते निलावती परमेश्वर, -बबन धोंडीबा जायभाय

जायभायवाडी – उगलमुगले सुशीला पोपट, -जायभाय भास्कर विठ्ठल  

बावी – निलेश दादासाहेब पवार , -दादासाहेब राहुनाथ मंडलिक  

सावरगाव - चव्हाण राधिका काकासाहेब ,-समुद्र रामदास दत्तात्रय

बांधखडक – राजेंद्र भीमा कुटे, -तानाजी खंडेराव फुंदे  

आशा प्रकारे तालुक्यातील दि ९ फेब्रुवारी  रोजी २४ तर १० फेब्रुवारी २३ ग्रामपंचायत चे गाव कारभाऱ्यांची निवड झाली आहे त्यात साकत व वाकी ग्रामपंचायत मध्ये प्रत्येकी एक एक जागेसाठी निवडणूक १२ मार्च रोजी होणार असल्याने त्या ग्रामपंचायत वगळल्या आहेत.त्यामुळे तालुक्यातील ४९ पैकी ४७ ग्रामपंचायत चे गाव कारभारी निवड झाली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या