Ticker

6/Breaking/ticker-posts

कर्जुले हर्याच्या मातोश्री हॉस्पिटलमध्ये मिळणार कोरोनाची लस .. !


पारनेरसह जुन्नर तालुक्यातील नागरिकांची सोय - 
 

डाॅ. दिपक आहेरलोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क

पारनेर : (दादा भालेकर) नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर टाकळी ढोकेश्वर - कर्जुले हर्या हद्दीवर असणारे मातोश्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये २५० रुपये मध्ये कोरोना लस मिळणार असल्याची माहिती हॉस्पिटलचे संचालक डाॅ.दिपक आहेर व सचिव किरण आहेर यांनी दिली आहे. 

   आरोग्य मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना रुग्णांसाठी कोरोना लसीकरण केंद्र या ठिकाणी सुरु करण्यात आले असल्याची माहिती डाॅ.श्वेंताबरी आहेर यांनी दिली आहे. पारनेर तालुक्यात कर्जुले हर्या येथील मातोश्री शैक्षणिक संकुलात कोरोना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.त्यामुळे पारनेर तालुक्यासह जुन्नर तालुक्‍यातील नागरिकांसाठी या कोव्हिड लसीकरणाची सोय होणार आहे.

 या हॉस्पिटलमध्ये कोव्हिड लसीकरणाच्या या टप्प्यामध्ये साठ वर्षाच्या पुढील सर्व ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षाच्या पुढील सह व्याधी(मधुमेह रक्तदाब हृदयविकार )असणाऱ्या व्यक्तींना या लसीचा लाभ घेता येणार असल्याचे डॉक्टर दीपक आहेर यांनी सांगितले आहे.

 या कोव्हिड लसीकरणासाठी आरोग्य सेतू किंवा कोविन ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी करणे बंधन कारक असून शासनाच्या निर्देशानुसार केले जाणार आहे. तरी या लसीकरण अभियानाचा तालुक्यातील सर्व पात्र नागरिकांनी लाभ घ्यावा व कोरोना साथ निर्मुलनास सहकार्य करावे असे आव्हान‌ डाॅ.दिपक आहेर यांनी केले आहे.

राज्यात नावलौकिक झालेल्या कोव्हिड सेंटरमध्ये कोव्हिड लसीकरणाची सोय...!

नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर टाकळीढोकेश्वर- कर्जुले हर्या हद्दीवर मातोश्री शैक्षणिक संकुलात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून सन‌ २०२० मध्ये अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील रूग्णांसाठी १ हजार बेडचे शरदचंद्रजी पवार कोव्हिड सेंटरचे लोकार्पण राज्याचे आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांच्या हस्ते सुरू करण्यात आले होते.या कोरोना सेंटरमध्ये ६ महिन्यात जवळपास ३ हजार रुग्णांवर मोफत उपचार झाल्याने या कोरोना सेंटरचा राज्यात नावलौकिक झाला होता.तेच कॉल सेंटर मध्ये आता लसीकरणाची सोय शासनाच्या वतीने उपलब्ध झाले असल्याने यासाठी मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानचे सचिव किरण आहेर व डॉक्टर दीपक आहेर यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या