Ticker

6/Breaking/ticker-posts

गतवर्षीच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना साडेतीन कोटी अनुदान ..! -अॅड . ढाकणेलोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क

टाकळीमानुर (ता. पाथर्डी ) : -मागील वर्षी मार्च ते मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाथर्डी -शेवगाव तालुक्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते ,बाधित शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे
केलेल्या केलेल्या पाठपुराव्यामुळे दोन्ही तालुक्यातील 105 गावातील सुमारे साडेचार हजार शेतकऱ्यांना तीन कोटी 51 लाख 39 हजार 44 रुपयाचे नुकसानीपोटी अनुदान भरपाई मिळाली असून दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची रक्कम वितरीत करण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांनी दिली .

अॅड . ढाकणे माहिती देताना पुढे म्हणाले, मागील वर्षाच्या मार्च ते मे 2020 कालावधीमध्ये पाथर्डी शेवगाव तालुक्यातील अनेक गावांना अतिवृष्टी झाले . शेकडो गावातील उभे पिके वाया गेली त्यानुसार पाथर्डी तालुक्यातील 95 गावातील तीन हजार 497 शेतकऱ्यांचे 2175 पॉईंट 91 क्षेत्र झाले तालुक्यातील पंधरा गावातील 837 शेतकऱ्यांचे 251 पॉईंट 64 सेक्टर चिकाचे नुसकान झाले . तातडीने नुसकान भरपाई मिळावी यासाठी या विषयीचा पाठपुरावा पालकमंत्र्यांकडे सुरूच ठेवला . त्यानुसार पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांना तीन कोटी 48 लाख 44 हजार यातील 33 लाख 97 हजार रुपयांचे नुसकान भरपाई म्हणून मंजूर करण्यात आले 

तसेच  मागील वर्षात परतीच्या पावसाने दोन्ही तालुक्यात मोठा मान घातले होते त्यामुळे जवळपास दोनशे गावातील शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला होता . हजारो शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले होते . नुकसानीची पाहणी करण्याची विनंती पालकमंत्र्यांकडे केल्यावर त्यांनी या दोन्ही तालुक्यांचा दौरा केला होता . त्यानुसार नुकसानीचे अनुदानापोटी 76 कोटी 50 लाख रुपयाचे नुकसान भरपाईचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला असल्याचे ढाकणे यांनी स्पषट केले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या