Ticker

6/Breaking/ticker-posts

पद्मश्री पोपटराव पवार यांच्यावर केंद्राने सोपवली मोठी जबाबदारी

 

केंद्रीय वने,पर्यावरण समितीवर पोपटराव पवार यांची नियुक्ती 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

नगर :-केंद्र सरकारच्या वने व पर्यावरण समितीच्या सदस्यपदी राज्याच्या आदर्श गाव योजना समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे. पोपटराव पवार यांच्या निवडीमुळे केंद्र सरकारच्या या समितीवर अलिकडच्या काळात राज्याला खूप कालावधीनंतर सदस्यत्व मिळाल्याचे सांगण्यात येते.

 केंद्र सरकारच्या वने व पर्यावरण समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. मागील महिन्यात या समितीच्या सदस्यपदी काम करण्याबाबत पोपटराव पवार यांना विनंती करण्यात आली होती. केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर हे या समितीचे अध्यक्ष असून त्यात लोकसभा, राज्यसभेच्या खासदारांसह सामाजिकपर्यावरणउद्योग तसेच इतर क्षेत्रातील मिळून ११ सदस्यांचा समावेश असतो. विशेष म्हणजे संपुर्ण देशभरातून समितीत सात अशासकीय अशासकीय सदस्यांची निवड केली जाते.

 यापुर्वी राज्यातून माजीमंत्री मोहन धारीया यांनी या समितीवर काम केले आहे. समितीमार्फत पडजमीनी वनाचछादित करणेजंगलतोड थांबविणेपर्यांवरण संतुलनाच्या दृष्टीने शहरी व ग्रामीण भागात हरितपट्टे निर्माण करणे ही कामे केली जातात. शाळामहाविद्यालयेउद्योगक्षेत्रेआजी माजी सैनिक संघटनाखाजगी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून वृक्षलागवडवृक्षसंवर्धन व जनजागृतीचे काम केले जाणार असल्याचे पोपटराव पवार यांनी सांगितले.

पोपटराव पवार यांच्या रुपाने जिल्ह्याला केंद्रीय समितीवर काम करण्याचा बहुमान मिळाला आहे. त्याबद्धल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या