Ticker

6/Breaking/ticker-posts

पूजाच्या वडिलांची परळी पोलिस ठाण्यात धाव ..!

 पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट ...
लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

परळी ( जि. बीड ) : -पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन राज्यात वादंग उठलं आहे. या घटनेला आज 19 दिवस उलटून गेले आहेत. शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांनी या प्रकरणी राजीनामा देखिल मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे . मात्र प्रकरण अजून शांत व्हायला तयार नाही . राजकारण आता थेट चुलीत चाललंय .या प्रकरणात आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शांताबाई राठोड यांनी एक नवा गौप्यस्फोट केला होता. आता त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांच्याच पोराने केली आहे .

पूजाच्या आई-वडिलांना संजय राठोड यांनी पाच कोटी रुपये पोहोचवले ,त्यामुळेच त्यांना पूजाच्या हत्याऱ्याविषयी बोलायचे नाही आणि पैशामुळे माझे चुलत आजी नातेही त्यांना दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी पूजाच्या आई वडिलांनी दिलेल्या खोट्या माहितीला बळी पडू नये आणि पूजाला न्याय द्यावा, अशी मागणी शांताबाई यांनी केली होती . हा आरोप बदनामीकारक आणि बेछुट आहे.

हा आरोप करणारी महिला शांताबाई राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पूजाच्या वडिलांनी आता परळी पोलिसांकडे धाव‌ घेतली आहे. आज त्यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आमच्यावर आरोप करणारी महिला शांताबाई राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मयत पूजाचे वडील लहु चव्हाण यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या